महाविकास आघाडी सरकार हे इतिहासातलं सर्वांत मोठं वसुली सरकार; फडणवीसांची सडकून टीका

महाविकास आघाडी सरकार हे इतिहासातलं सर्वांत मोठं वसुली सरकार; फडणवीसांची सडकून टीका

Devendra Fadnavis on Mahavika Aaghadi : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि तत्कालिन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे केवळ खुर्चीसाठी पवारांसोबत गेले होते, महाविकास आघाडी (Mahavika Aaghadi) सरकारने अडीच वर्षात फक्त वसुली केली, अशी घणाघाती टीका फडणवीसांनी केली.

Ankita Patil : आम्हाला खूप त्रास होतोय म्हणत हर्षवर्धन पाटलांच्या कन्येची फडणवीसांसमोर पुन्हा व्यथा 

बारामती लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एकोपा वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज इंदापूरमध्ये सभा झाला. या सभेला संबोधित करतांना त्यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. ते म्हणाले, 2019 साली जनतेने महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीला पूर्ण बहुतम दिलं होतं. पण, महायुतीला पूर्ण बहुमत असतांनाही जे पक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढले, त्यांनी जनेतेची फसवणूक केली आणि एक झाले. जनमत डावलून त्यांनी महाविकास आघीडीचं नवं सरकार स्थापन केलं. उद्धव ठाकरे हे महायुतीचा घटक होते, पण ते केवळ खुर्चीसाठी पवारांसोबत गेल्याची टीका फडणवीसांनी केली.

‘फडणवीससाहेब, दबावासाठीचे फोन बंद करा’; हर्षवर्धन पाटलांची भाषणातच मागणी 

सर्वांत मोठं वसुली सरकार
पुढं बोलतांना फडणवीस म्हणाले, अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत होतं. याकाळात भाजपला करावा लागला. या सरकारने सामान्य जनतेवरही अन्याय केला. या सरकारने अडीच वर्षात कोणतेही ठोस निर्णय घेतले नाही. तर अडीच वर्ष फक्त वसुली केली. हे राज्यातल्या इतिहासातलं सर्वांत मोठं वसुली सरकार होतं, अशी टीका फडणवीसांनी केली.

ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना काळीमा फासला
बाळासाहेब ठाकरेंनी ज्या उद्देशाने शिवसेनेची स्थापना केली होती, त्याला काळीमा उद्धव ठाकरेंनी काळीमा फासला. ठाकरे सत्तेच्या मोहापायी कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत गेल्यानं एकनाथ शिंदे पक्ष घेऊन बाहेर पडले होते. राष्ट्रवादीतही अशीच खदखद होती. नरेंद्र मोदींशिवाय राज्याचा आणि देशाचा विकास कोणी करू शकत नाही, याची जाणीव झाल्यानं अजित पवारांनी मोदींच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतल्याचं फडणवीस म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज