‘फडणवीससाहेब, दबावासाठीचे फोन बंद करा’; हर्षवर्धन पाटलांची भाषणातच मागणी
Harshavardhan Patil On Datta Bharne : देवेंद्र फडणवीससाहेब, दबावासाठी वरुन फोन येत असतात, हे फोन बंद करा, अशी विनंतीच भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील (Harshavardhan Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांना केली आहे. दरम्यान, इंदापुर तालुक्यात आज भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यासाठी देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या इतर नेत्यांची उपस्थिती होती. या मेळाव्यादरम्यान, बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवार गटाचे आमदार दत्ता भरणे (Datta Bharne) यांचं नाव घेता हल्लाबोल केला आहे.
Mylek Exclusive: ‘करिअरसाठी धक्का देण्याचं काम आईने केलं’; अभिनेत्रीने स्पष्टच सांगितलं, म्हणाली…
हर्षवर्धन पाटील म्हणाले, इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढत आहे. आमच्या कार्यकर्त्यांवर खोटेनाटे गुन्हे दाखल केले जात आहेत . एखाद्याला मारहाण केली तर ज्याला मारहाण झाली त्याच्याआधीच मारहाण करणारा पोलिसांत तक्रार करतो. मग ज्याला मारहाण झालीयं त्याची तक्रार न घेण्यासाठी वरुन फोन येत असतो फडणवीसांसाहेबांना विनंती आहे की, हे वरुन येणारे फोन बंद केले पाहिजेत, असं हर्षवर्धन पाटील भाषणात बोलताना म्हणाले आहेत.
‘रत्नागिरीवरील दावा सोडलेला नाही, सोडणारही नाही’; सामंतांनी पुन्हा ठणकावलं
तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याशी 1999 पासून आमचे ऋणानुबंध आहेत. मी 2019 साली फडणवीसांसोबत आलो. मला खूप त्रास झाला. आता भ्रष्टाचाराच्या बाबतीत लक्ष घालावं लागणार आहे कारण इंदापुरातील जनता त्रस्त झालेली आहे. मी सध्या कुठल्याही पदावर नाही. पदासाठी काम करणारे कार्यकर्ते आम्ही नाहीत, निरोप दिला अन् हजारोंच्या संख्येने आज सर्वसामान्य माणसं आली असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं आहे.
‘बडे मियाँ छोटे मियाँ’ सिनेमाचं तगडं बजेट; अक्षय कुमार, टायगर श्रॉफ यांच्या फीचा आकडा थक्क करणारा
दरम्यान, इंदापुरबाबत देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय नेतेमंडळींशी चर्चा झालेली आहे. तुम्ही काही काळजी करु नका इंदापूरबाबत आम्ही निर्णय घेणार असल्याचं मला सांगण्यात आलं आहे. देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत, त्यांनी एवढ्या अडचणीत आज इंदापुरसारख्या एका तालुक्यासाठी आज वेळ दिलायं. काही दिवसांपूर्वीच अजितदादा, आणि देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक झाली आहे. इंदापूर तालुक्याबाबतचे सर्वच प्रश्न मांडले आहेत. आता फक्त देवेंद्र फडणवीसांनी इंदापूरचं पालकत्व स्विकारवं, अशी विनंतीच हर्षवर्धन पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.