Devendra Fadnvis : अरे…नादान माणसा! तू सावरकर नाही अन् गांधीही नाही…

Devendra Fadnvis : अरे…नादान माणसा! तू सावरकर नाही अन् गांधीही नाही…

नागपूर : अरे नादान माणसा तू ना सावरकर ना गांधी होऊ शकतो, तू सावरकरही नाही अन् गांधीही नाही, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना सुनावलं आहे. आज नागपुरात स्वातंत्र्यवीर सावरकर यात्रेच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते.

चंद्रकांतदादांची गुगली : ठाकरे आणि शिंदे अशा दोन तलवारी एकत्र ठेवणार

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, राहुल गांधी म्हणाले की माफी मागायला मी सावरकर नाही. पण सावरकर होण्यासाठी मोठा त्याग करावा लागतो. सावरकरांना ज्या छोट्याशा खोलीत सावरकरांना डांबल होतं त्याच ठिकाणी राहुल गांधींना मी एसी लावून देतो त्यांनी एक रात्र राहुन दाखवावं, असं खुलं आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

खासदार नवनीत राणांच्या जन्मतारखेवरुन नवा वाद

तसेच आपल्या देशाचा इतिहास आणि वर्तमान माहित नसणारे लोकं सध्या जन्माला आले आहेत. ज्यांचं स्वत:च भविष्य नाही पक्षाच भविष्य नाही ते रोज उठून सावरकरांना शिव्या देतात. त्याच लोकांना प्रत्युत्तर देण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय.

Letsupp Special : ठाकरे विरुद्ध फडणवीस : लाज वाटत नाही का? ते फडतूस!

फडणवीस यांनी बोलताना त्यांनी सावरकर यांना इंग्रजांनी दिलेल्या शिक्षेबाबत स्पष्ट केलं आहे. फडणवीस म्हणाले, अंदमानच्या छोट्याशा खोलीत सावरकरांना डांबलं होतं. तिथेच मलमूत्राचं विसर्जन कराव लागायचं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. भारतात इंग्रज राजवट असताना 1857 चं बंड करण्यात आलं होतं. हे भारताचं पहिलं स्वातंत्र्ययुद्ध होतं असं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजांविरोधात भारतभर पसरवलं होतं, असंही ते म्हणालेत.

दरम्यान, जर स्वातंत्र्यवीर सावरकर माफीवीर असते तर इंग्रजांनी गुप्तहेर खात्याचा सर्वाधिक पैसा सावरकरांसाठी खर्च केला नसता असंही फडणवीसांनी सांगितलं असून मानवतेपेक्षा मोठा कोणताही धर्म नाही हे सांगणारे सावरकर होते, असंही फडणीसांनी स्पष्ट केलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube