चंद्रकांतदादांची गुगली : ठाकरे आणि शिंदे अशा दोन तलवारी एकत्र ठेवणार
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाळीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील धुसफुस राज्यातील जनता रोज पाहात असते. दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. हे दोन्ही गट एकमेकांची कायम कोंडी करत असतात. अशातच आता राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी मोठं वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे हिंदुत्वासाठी एकत्र आले पाहिजे, मला आदेश आल्यास मी त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी पुढाकर घेईल, असं त्यांनी सांगितलं.
चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं की, सत्तांतरानंतर राज्याच्या राजकारणात ठाकरे गट आणि शिंद गटाकडून रोज चिखलफेक होत आहे. आरोप-प्रत्यारोप होत असतात. खरंतर यात सामान्य माणासांना आता जराही रस उरला नाही. हे सगळे हिंदूत्वाचं काम करत आहेत. पण, या सगळ्यात हिंदुत्वाचं मोठं नुकसान होत आहे. त्यामुळं हे सगळं आता थांबल पाहिजे, असं वाटतं. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे हिंदुत्वासाठी एकत्र आले पाहिजे, असं वाटतं राहतं. मला तसा आदेश आल्यास किंवा कुणी तसं सांगितल्यास मी त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी नक्कीच पुढाकार घेईल.
न्यायालयाच्या निकालासंदर्भात बोलतांना पाटील म्हणाले की, न्यायालयाच्या निकालावर टिप्पणी करणं योग्य नाही. पण सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यावर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल.
MLA Sunil Tingre : वडगाव शेरीतील ‘हे’ प्रश्न प्रलंबित! महापालिकेविरोधात बसणार उपोषणाला…
एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेत बंडाळी केली. त्यामुळं राज्याच्या राजकारणात मोठा भुकंप झाला होता. 40 आमदार फुटल्यानं महाविका आघाडी सरकार कोसळलं होतं. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. दरम्यान, सत्तासंघर्षाचं प्रकरण हे सुप्रीम कोर्टात गेलं. सध्या सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण झाली असून फक्त न्यायायलयाचा निकाल बाकी आहे. निकाला कधीही येऊ शकतो. ठाकरे गट आणि शिंदे गटांकडून निकालासंदर्भात वेगवेगळे दावे केले जात चआहेत. अशातच चंद्रकांत पाटील यांनी शिंदे-ठाकरे एकत्र आले पाहिजे, असं वक्तव्य केलं. त्यामुळ राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.