Nishanchi Teaser Released : अमेझॉन MGM स्टुडिओजच्या बहुप्रतिक्षित पहिल्या थिएटरिक रिलीज ‘निशानची’ (Nishanchi Teaser) चा जबरदस्त टीझर नुकताच प्रदर्शित झालाय. सोशल मीडियावर आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये (Entertainment News) याला प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. अॅक्शन, थ्रिल आणि इमोशन्सचा परिपूर्ण संगम असलेल्या या टीझरमुळे प्रेक्षकांत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. अनुराग कश्यप यांच्या सिग्नेचर स्टाईलमध्ये परतण्याचे संकेत देणाऱ्या या टीझरमुळे अनेक सेलिब्रिटीही (Celebrities) भारावून गेले आहेत.
आहान पांडे, बनीता संधू, विनीते कुमार सिंग यांच्यासह अनेक स्टार्सनी (Bollywood News) टीझरचं केलं कौतुक. ‘सैयारा’ या आगामी प्रोजेक्टमधून झळकणारे नवे अभिनेता आहान पांडे यांनी टीझर शेअर करत लिहिलंय की, @aaishvarythackeray, आम्हाला माहिती आहे तू किती मेहनत केलीस आणि तुला हे किती महत्त्वाचं आहे. आता तुझा क्षण आलाय – टायगर, तुझी तुलना कुणाशीच होऊ शकत नाही. @vedikapinto तू नेहमीसारखीच जबरदस्त आहेस… जग अजून तयार नाहीये यासाठी. @anuragkashyap10 सर, तुमच्या आवडत्या शैलीत परतल्याबद्दल धन्यवाद.
आंतरराष्ट्रीय युवा दिन : तरूणांचा शेअर मार्केटला राम-राम, ‘या’ ठिकाणी गुंतवणूक, कोल्हापूर ‘टॉपवर
विनीत कुमार सिंह यांनी लिहिलं, “शानदार ”, तर भूमी पेडणेकर यांनी उत्साह व्यक्त करत लिहिलं, “खूप छान. @anuragkashyap10 सर, तुमचं काम मिस करत होतो 🤩”. बनीता संधू यांनीही लिहिलं, “हे पाहण्यासाठी थांबूच शकत नाही @vedikapinto @anuragkashyap10”.
‘निशानची’ मध्ये ऐश्वर्य ठाकरे यांचा जबरदस्त डेब्यू पाहायला मिळणार असून, त्यांनी एका हाय-एनर्जी डबल रोलमध्ये कमाल केली आहे. त्यांच्या जोडीला वेदिका पिंटो असून, मोनिका पंवार, मोहम्मद ज़ीशान अय्यूब आणि कुमुद मिश्रा हे देखील प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. टीझरमधून अनुराग कश्यप यांच्या शैलीचा ठसा स्पष्ट दिसतो आहे. एक असा सिनेमॅटिक अनुभव जो मोठ्या पडद्यावर पाहणं हे प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे, कारण अशा प्रकारची सिनेमॅटिक शैली हल्ली क्वचितच पाहायला मिळते.
‘टँगो मल्हार’मधून उलगडणार रिक्षा चालकाचा प्रवास! चित्रपट चाहत्यांच्या भेटीला कधी येणार?
‘निशानची’ ची निर्मिती अजय राय आणि रंजन सिंग (जार पिक्चर्स) यांनी फ्लिप फिल्म्सच्या सहकार्याने केली असून, दिग्दर्शनाची जबाबदारी अनुराग कश्यप यांनी सांभाळली आहे. या सिनेमाची कथा प्रसून मिश्रा, रंजन चंदेल आणि अनुराग कश्यप यांनी मिळून लिहिली आहे. ‘निशानची’ 19 सप्टेंबर 2025 रोजी सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.