‘टँगो मल्हार’मधून उलगडणार रिक्षा चालकाचा प्रवास! चित्रपट चाहत्यांच्या भेटीला कधी येणार?

‘टँगो मल्हार’मधून उलगडणार रिक्षा चालकाचा प्रवास! चित्रपट चाहत्यांच्या भेटीला कधी येणार?

Saya Date Directed Film Tango Malhar : चित्रपट या माध्यमाची जादू काही औरच आहे. कोणत्याही क्षेत्रात काम केलं, तरी स्वतः चित्रपट (Entertainment News) करण्याची उर्मी काहींना स्वस्थ बसू देत नाही. संगणक शास्त्रज्ञ तसेच उद्योजिका असलेल्या साया दाते यांनी आगामी ‘टँगो मल्हार’ (Film Tango Malhar) या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर (Marathi Movie) लॉन्च करण्यात आले. येत्या 19 सप्टेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

“टँगो मल्हार” या चित्रपटाची निर्मिती ॲगलेट्स अँड आयलेट्स प्रॉडक्शन या निर्मिती संस्थे अंतर्गत करण्यात आली असून साया दाते (Saya Date) या निर्मात्या आहेत. “टँगो मल्हार” या चित्रपटात एका रिक्षा चालकाची गोष्ट उलगडण्यात आली आहे. काहीतरी नवीन करू (Tango Malhar Released On 19 September) पाहणाऱ्या तरुण अशा मल्हारला अचानकपणे “टँगो” या अर्जेटिनाच्या नृत्य प्रकाराचा शोध लागतो आणि त्याची आवड निर्माण होते. या नृत्य प्रकारामुळे त्याच्या आयुष्यात काय काय गोष्टी रंजकपणे घडत जातात. या कथासूत्रावर ‘टँगो मल्हार’ हा चित्रपट बेतला आहे.

कलावंताचं घर वाचवा! किशोर कदमांच्या पोस्टची CM फडणवीसांकडून काही तासांतच दखल, सचिवांना महत्त्वाचे आदेश

चित्रपटाचं लेखन साया दाते, मनीष धर्मानी यांनी केलंय. सुमेध तरडे, ओंकार आठवले यांनी छायांकन, क्षमा पाडळकर यांनी संकलन, तुषार कांगारकर यांनी ध्वनी आरेखन, शार्दूल बापट, उदयन कानडे यांनी संगीत आणि पार्श्वसंगीत केलं आहे. चित्रपटात नितेश कांबळे, कीर्ति विश्वनाथन, सीमा वर्तक, अक्षय गायकवाड, मनीष धर्मानी, मनीषा महालदार, संदेश सूर्यवंशी, पंकज सोनावणे या नवोदित कलाकरांचा अभिनय आपल्याला पहायला मिळणार आहे.

साया दाते यांनी अमेरिकेतील प्रतिष्ठित “मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी” (एमआयटी) येथून मॅकेनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी दहा वर्षं तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करताना अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीत युट्यूबमध्ये काम केलं, त्यानंतर भारतात परत येऊन पुण्यात स्वतःची कंपनी उभी केली. उद्योग क्षेत्रातील कामगिरीसाठी प्रतिष्ठित फोर्ब्जच्या ’30 अंडर 30′ या यादीत त्यांना स्थान मिळालं होतं.

अभिनेते किशोर कदम अडचणीत, राहतं घर वाचवण्यासाठी CM फडणवीसांना आवाहन

साया यांच्यात चित्रपट प्रेमाचं बीजं बालपणीच पेरलं गेलं होतं. वयाच्या 12 व्या वर्षी त्यांनी ‘ऑन द अदर लाइन’ ही शॉर्टफिल्म दिग्दर्शित केली होती. अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात सुद्धा ही शॉर्टफिल्म गौरवली गेली. त्याशिवाय त्या स्वतः टँगो डान्सरही आहेत. त्यामुळे एकीकडे तंत्रज्ञान, उद्योगात उत्तम काम करत असताना कलेची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे आपली आवड जपण्यासाठी त्यांनी ‘टँगो मल्हार’ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले आहे. त्यामुळे एका संगणक शास्त्रज्ञ, उद्योजिकेचा मराठी चित्रपट निर्मिती, दिग्दर्शनाचा प्रयत्न नक्कीच उत्सुकता वाढवणारा आहे यात शंका नाही.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube