भारत अमेरिकेसोबतच्या ट्रेड डीलवर ठाम; आता नवीन ट्रेड वॉर सुरु होणार का?

भारत अमेरिकेसोबतच्या ट्रेड डीलवर ठाम; आता नवीन ट्रेड वॉर सुरु होणार का?

Trade Deal Expires : ट्रेड डीलसाठी भारत आणि अमेरिका आपआपल्या अटींवर ठाम आहे. (Deal) भारताने या ट्रेड डीलवर ठोस भूमिका घेतली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रेड डीलसाठी दिलेली मुदत ९ जुलै रोजी संपणार आहे. दरम्यान, भारताने या भूमिकेतून डोनाल्ड ट्रम्प यांना कठोर संदेश दिला आहे. यामुळे भारत आणि अमेरिका दरम्यान ट्रेड वॉर सुरु होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

भारत डेडलाइनच्या माध्यमातून कोणतीही ट्रेड डील करणार नाही. अमेरिकेसोबतचा प्रस्तावित व्यापार करार पूर्णपणे अंतिम झाल्यावर पूर्ण केला जाणार आहे. हा करार राष्ट्रीय हिताचा असेल तरच तो स्वीकारला जाणार आहे. भारत युरोपियन युनियन, न्यूझीलंड, ओमान, अमेरिका, चिली आणि पेरूसह विविध देशांसोबत एफटीएसाठी वाटाघाटी करत आहे असं केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे.

पाकिस्तानी सेलिब्रिटींना दणका! फक्त 24 तासांत सोशल मीडिया खात्यांवर भारतात पुन्हा बंदी

अमेरिकेसोबतच्या प्रस्तावित अंतरिम व्यापाराबद्दल बोलताना ते म्हणाले, एफटीए तेव्हाच शक्य आहे, जेव्हा तो दोन्ही पक्षांसाठी फायदेशीर असणार आहे. राष्ट्रीय हित नेहमीच सर्वोपरी असले पाहिजे. हे लक्षात घेऊन जर करार झाला तर भारत विकसित देशांसोबत करार करण्यास नेहमीच तयार असतो. अमेरिकासोबत अंतरिम व्यापार करार ९ जुलैपर्यंत पूर्ण होणार का? त्यावर बोलताना गोयल म्हणाले, भारत विशिष्ट डेडलाइनवर व्यापार करार करणार नाही. जेव्हा करार पूर्ण होईल आणि तो देशहिताचा असेल तेव्हाच स्वीकारण्यात येणार आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या उत्पादनासाठी २६ टक्के कर लावला होता. त्यानंतर ९० दिवसांसाठी हा निर्णय स्थगित केला. आता अमेरिका ९ जुलैपूर्वी व्यापारी करार पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. परंतु, भारताकडून जोपर्यंत अंतिम स्वरुप होत नाही, तोपर्यंत करार होणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. या करारासाठी दोन्ही देशांकडून अधिकारी आणि मंत्री पातळीवर चर्चा झाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या