Download App

‘दारु पिऊन निर्मिती सावंत यांनी केलं ‘झिम्मा 2’चे शूटिंग?; अभिनेत्री खुलासा करत म्हणाली…

Nirmiti Sawant Jhimma 2: मराठी चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन विश्वातील कॉमेडी क्वीन म्हणून निर्मिती सावंत (Nirmiti Sawant ) यांना ओळखले जाते. सध्या मराठी ‘झिम्मा 2’ (Jhimma 2) या सिनेमाची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली आहे. येत्या 24 नोव्हेंबर दिवशी हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. यामुळे सध्या या सिनेमातील अभिनेत्री आणि त्यांचे एकसे बढकर एक किस्से सोशल मीडियावर (Social media) चर्चा होत असल्याचे बघायला मिळत आहे. या सिनेमात अभिनेत्री निर्मिती सावंतचा दारु पितानांचा एक व्हिडिओ आहे. तिचा हा व्हिडिओ बघितल्यावर त्यांनी खरोखरच दारु पिऊन हा सीन शूट केला होता का? असा सवाल चाहत्यांना पडला होता. यावर आता अभिनेत्रीने उत्तर दिलं आहे.

सध्या ‘झिम्मा 2’ ची संपूर्ण टीम सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी असल्याचे बघायला मिळत आहे. यामुळे या सिनेमाच्या निमित्ताने ते अनेक ठिकाणी भेट देत आहेत. चाहत्यांशी संवाद साधत असताना त्यांना सिनेमामध्ये खरी दारु प्यायली की नाही असा सवाल करण्यात आला.

‘झिम्मा 2’ च्या ट्रेलरमध्ये निर्मिती सावंत (nirmiti sawant) यांचा एक सीन दाखवण्यात आला आहे. ज्यात त्या दारु पित असल्याचे बघायला मिळाले आहे. त्यांचा हा सीन सोशल मीडियावर सध्या चर्चाचा विषय ठरला आहे. एवढेच नाही तर त्याच्यावरुन काही भन्नाट मीम्स देखील तयार करण्यात आले आहेत. हा सीन नेमका कसा शूट करण्यात आला त्याबद्दल अभिनेत्रीने खुलासा केलं आहे.

Animal Movie: ‘अ‍ॅनिमल’ प्रमोशनदरम्यान इंडस्ट्रीत बॉबी देओलची स्टाइल ठरतेय आयकॉन

“तुम्हाला सगळ्यांनाच मजा वाटेल या गोष्टीची. मात्र, मला दारु, सिगारेट, तंबाखू अगदी चहा सुद्धा यापैकी कसलंच व्यसन आजिबात नाही. आणि, मला माहित नाही कसं परंतु ते दारुचे सीन माझ्याकडून खूप छान होत असतात. मला अनेकजण विचारत असतात. मग मला असं वाटतं की निरीक्षणामुळे असं असेल का? तर नाही. कारण, मी एकदाही असं कोणाचं निरीक्षण केले नाही. मी विचार केला की निर्मला गावची मोकळी ढाकळी बाई आहे. तिने जर अशी दारु प्यायली आणि तिला चढली तर ती कशी वागेल. जे लोकांना आवडतंय ना मी जशी ट्रेलरमध्ये हसते ते आपोआप आलंय. मी फक्त स्वत:ला बजावते की, तू निर्मला कोंढेपाटील आहे”, असं निर्मिती सावंतने याबाबत खुलासा केला आहे.

पुढे त्या म्हणतात की, ‘मग त्या रिऍक्शन चाहत्यांना आवडतात. एका सीनच्या वेळी तर मी हेमंतला बाहेर काढलं होतं. कारण, तो खूप जोरदार हसत होता. त्याचं हसणं पाहून मला देखील खूप हसू येत होतं. एका शूटिंगच्या दरम्यान तर आमचा डीओपी हेमंतच्या खांद्याला चावला. कारण, आमचे शूटिंग बघून त्याला इतकं हसू येत होतं. की हसू बाहेर पडू नये म्हणून त्याने चक्क हेमंतच्या खांद्याला चावा घेतला. दरम्यान 24 नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमा निर्मिती सावंत, रिंकू राजगुरु, शिवानी सुर्वे, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, क्षिती जोग, सुहास, सिद्धार्थ चांदेकर ही कलाकार मंडळी मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज