Download App

Mirzapur 3: ‘मिर्झापूर 3’ मधून मुन्ना भैय्याचा पत्ता कट? खुद्द अभिनेत्यानेचं सांगितलं कारण

Mirzapur 3: आत्तापर्यंतच्या सर्वात लोकप्रिय वेब सिरीज ‘मिर्झापूर’च्या (Mirzapur 3 web series) पुढील भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या वर्षी या सिरीजचा तिसरा भाग येणार आहे, ज्यासाठी प्रेक्षक खूपचं उत्सुक झाल्याचे दिसत आहेत. (web series)) आता 4 वर्षांनंतर ‘मिर्झापूर 3’ येणार आहे. (Social media) त्यामुळे सगळेच त्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. लोकांना या सिरीजची कथा आणि पात्र खूप आवडले आहेत. या सिरीजतील एका पात्राला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले आणि ते म्हणजे मुन्ना भैय्याचे (Munna Bhaiyya) पात्र. मात्र आता हे पात्र चाहत्यांना पाहायला मिळणार नाही.

‘मिर्झापूर 3’ मध्ये मुन्ना भैय्याची दहशत दिसणार नाही.

मुन्ना भैय्याचे पात्र ‘मिर्झापूर 3’मध्ये दिसणार नाही. दिव्येंदू शर्मा या सिरीजमध्ये मुन्ना भैय्याची भूमिका साकारत होता. पण 2 सीझननंतर आता तिसऱ्या सीझनमध्ये त्याचे पात्र काढून टाकण्यात आले आहे. याचा अंदाज या सिरीजच्या घोषणेपासूनच बांधला जात होता. पण आता खुद्द दिव्येंदूनेच याची पुष्टी केली आहे.

दिव्येंदूने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे की, यावेळी तो ‘मिर्झापूर 3’चा भाग होणार नाही. ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’शी झालेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्याने मुन्ना भैय्या या व्यक्तिरेखेचा त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर कसा परिणाम होत होता हे थेटच सांगितले आहे.

आशा भोसलेंनी शेअर केल्या बाबुजींसोबतच्या आठवणी; ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाला दिल्या शुभेच्छा

मुन्ना भैया या पात्राबद्दल काय म्हणाला?

दिव्येंदू म्हणाला की- जेव्हा मी या व्यक्तिरेखेमध्ये होतो तेव्हा माझ्या व्यक्तिमत्त्वावर खूप परिणाम होत होता. आपण कोणत्याही व्यक्तिरेखेचा अति-रोमँटिक करू नये. हे इतके अवघड आहे की आपण कोणत्या झोनमध्ये आहात हे देखील आपल्याला माहित नाही. पण त्यातून बाहेर आल्यावर त्याचा परिणाम जाणवतो. दिव्येंदू या मालिकेत अनुपस्थित राहिल्याने त्याचे चाहते निराश झाल्याचे दिसत आहेत.

‘मिर्झापूर’चा तिसरा सीझन कधी रिलीज होणार?

मिर्झापूरचा पहिला सीझन 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. पहिल्या सीझनला खूप प्रेम मिळाले, त्यानंतर त्याचा दुसरा सीझन 2020 मध्ये आला. मिर्झापूर 2 पासून चाहते तिसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. आता 4 वर्षांनंतर चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे. निर्मात्यांनी या मालिकेचे पोस्टर रिलीज केले आहे, परंतु अद्याप त्याच्या प्रदर्शनाची कोणतीही तारीख समोर आलेली नाही. आता चाहत्यांना सीझन 3 साठी किती काळ वाट पाहावी लागणार आहे.

follow us

वेब स्टोरीज