Sexual harassment case against actor Nivin Pauly: : मल्याळम चित्रपटसृष्टीमध्ये (Malayalam film Industry) सध्या महिला कलाकारांच्या लैंगिक छळाचे प्रकरण गाजत असून, या प्रकरणी हेमा कमिटीचा (Hema Committee) अहवाल आहे. त्यात अनेक चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेते, दिग्दर्शक यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप झाले आहेत. त्यातच आता प्रसिध्द लोकप्रिय मल्याळम अभिनेता निविन पॉलीविरुद्ध ( Nivin Pauly) एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केलाय. याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे. त्याच्याविरोधात केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात अजामीनपात्र गुन्हा नोंदविण्यात आलाय.
संगमनेरातून थोरात यांच्या कन्याही विधानसभेच्या रिंगणात? प्रणिती शिंदे यांचे मोठे विधान
परदेशात असताना निविन पॉलीने तिच्याशी गैरवर्तन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहेत. तिला एका चित्रपटात भूमिका देण्याचे आश्वासन दिल्यानंतर अभिनेताने तिच्याशी गैरवर्तन केले आहे. ही घटना दुबईत घडली आहे.
पाकिस्तानला धक्का, बांगलादेशकडून मालिका गमावली, रचला लज्जास्पद विक्रम
यापूर्वी सिद्दीक, जयसूर्या, मुकेश, मणियानपिल्ला राजू, इदवेला बाबू आणि दिग्दर्शक रंजित यांच्यावरही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा सहावा गुन्हा आहे.
हेमा कमिटीमुळे पोलखोल
मल्याळम चित्रपटसृष्टीमध्ये महिला कलाकार, आर्टिस्ट यांचे लैंगिक छळाचे आरोप होत होते. त्यामुळे सरकारने हेमा कमिटीची स्थापना केली. या कमिटीचा अहवाल आला आहे. त्यात अनेक अभिनेते, दिग्दर्शक यांच्यावर महिला कलाकारांनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. हा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी होत आहे. या अहवालानंतर आता गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. अभिनेता जयसूर्या आणि मुकेश यांच्यासह अनेक जणांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. सुपरस्टार मोहनलाल यांनी असोसिएशन ऑफ मल्याळम मुव्ही आर्टिस्टचे अध्यक्षपदही सोडले आहे.