विद्यार्थिनींच्या लैंगिक छळ प्रकरणी मुंडे आक्रमक; आरोपींसोबतच्या फोटोंवरून संदीप क्षीरसागरांवर हल्लाबोल

Dhananjay Munde on Sandip Kshirsagar for Sexual Harassment by Teachers in Beed : बीडमधून (Beed) एक धक्कादायक घटना समोर आली होती. येथील एका खाजगी कोचिंग क्लासेसमधील दोन शिक्षकांनी एका अल्पवयीन विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. त्यानंतर या दोन शिक्षकांना अटक झाली आहे. या शिक्षकांचे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागरांशी संबंध असल्याचं बोललं जात आहे. यावरून आमदार धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत संदीप क्षीरसागरांवर हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले धनंजय मुंडे?
पवारने पैशांच्या दबावाने अनेक छोटे क्लासेस बंद केले. तसेच त्यांचे संबंध आमदार संदीप क्षीरसागरांशी आहेत. तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्यारात्री हा आरोपी संदीप क्षीरसागरांबरोबर होता. हे दोघेसोबत का होते? त्यामागील कारण काय? हे पोलीस तपासात आलं पाहिजे. त्यांचे संबंध हे अर्थिक आहेत की, इतर काही. या क्लासेसची चर्चा खूप दिवसांपासून दबून होती.
5 जुलैचा मोर्चा रद्द, पण विजयी मेळावा होणार; राज ठाकरेंची घोषणा
येथे अल्पवयीन विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण होत होते. पण यावर आवाज उठवला नाही. पण हा माथेफिरू प्राध्यापक कसा झाला? मी या पिडीत कुटुंबाला भेटतो. तसेच याआरोपीने अनेक नेत्यांसोबत आपले फोटो पोस्ट करून राजकीय दबाव निर्माण केला. त्यातून आपली अर्थिक बाजू भक्कम केली. त्यातून तो प्लॉटींग व्यावसायात आला. या प्रकरणी मी देवेंद्र फडणवीसांकडे एसआयटी नेमण्याची मागणी करणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
एका खाजगी कोचिंग क्लासेसमधील दोन शिक्षकांनी एका अल्पवयीन विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक बाब समोर आली. या विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनंतर छेडछाड आणि लैंगिक शोषण प्रकरणी दोन शिक्षकांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आता शिक्षकांना अटक झाली आहे.
हिंदी सक्तीचा दिल्लीचा आदेश घाबरून मागे घेतला; रोहित पवारांचा फडणवीसांना टोला
या गुन्ह्यातील आरोपींच नाव विजय पवार आणि प्रशांत खाटोकर अशी आहेत. याबाबत पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीमधून मिळालेल्या अधिक माहितीनुसार हा धक्कादायक प्रकार 30 जुलै 2024 ते 25 मे 2025 या काळात सातत्याने घडला. पीडित अल्पवयीन मुलगी ही नीट परीक्षेच्या अभ्यासासाठी बीडमधील उमाकिरण कोचिंग क्लासेस या खाजगी कोचिंग क्लासमध्ये जात असे. तिथे आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांनी तिच्यासोबत छेडछाड करून तिचं लैंगिक शोषण केलं.
पावसाळी अधिवेशनाच्या पासेसवरून अशोकस्तंभच हटवला, अधिवेशाच्या सुरूवातीलाच वाद पेटणार…
पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी प्रशांत खाटोकर याने गतवर्षी जुलै महिन्यांपासून तिच्या लैंगिक छळास सुरुवात केली. प्रशांत खाटोकर हा पीडित मुलगी वर्गातून सुटल्यावर रस्त्यावर जाऊन थांबायचा. तसेच तिला आपल्यासोबत येण्यासाठी जबरदस्ती करायचा. एवढंच नाही तर कधी कधी क्लास संपल्यावर तो या मुलीला केबिनमध्ये बोलवायचा. तसेच कपडे काढण्यासाठी जबरदस्ती करायचा. त्यानंतर तिच्या शरीराला स्पर्श करायचा, तसंच याबाबत घरी सांगितल्यास जिवे मारेन अशी धमकी द्यायचा, असा आरोप पीडितेने केला आहे.
लालछडी..! प्राजक्ताचा लाल शरारा ड्रेसमध्ये ग्लॅमरस लूक
एवढंच नाही तर आरोपींनी आपले अश्लील फोटोही काढल्याचं पीडितेने तिच्या तक्रारीत म्हटलं आहे. त्याचबरोबर, पीडित मुलीने या प्रकाराबाबत दुसरा शिक्षक असलेल्या विजय पवार याला माहिती दिल्यानंतर त्यानेही तिची मदत न करता तिचं शोषण केलं. विजय पवार हा सुद्धा मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा. एकटीला बोलावून घ्यायचा, त्यामुळे इतर विद्यार्थीही माझ्याकडे वाईट नजरेने पाहायचे असं पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे.
Hera Pheri 3 मध्ये चाहत्यांना पुन्हा भेटणार राजू, श्याम आणि बाबूची जोडी; परेश रावल यांची वापसी
या सर्व छळाला कंटाळून पीडित मुलगी ही मानसिक तणावाखाली गेली. मुलीच्या वागणुकीत झालेल्या बदलामुळे तिच्या कुटुंबीयांनी विचारणा केल्यावर तिने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत वडिलांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेऊन आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पुढील तपासास सुरुवात केली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींचंही राजकीय कनेक्शन असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.