Download App

‘छावा’ सारख्या चित्रपटाचा भाग होणे, स्वतःला मी नशीबवान समजतो ; ओंकार महाजन

Omkar Mahajan : 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'छावा' (Chhaava) ची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे.  कलाकार, दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी

  • Written By: Last Updated:

Omkar Mahajan : 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘छावा’ (Chhaava) ची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे.  कलाकार, दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी, व्हीएफएक्स हे सगळे कमाल आहेच. याव्यतिरिक्त या चित्रपटाला लाभलेली कथा आणि पटकथा लिहिणारी टीमही तितकीच जबरदस्त आहे.

ऐतिहासिक चित्रपट असल्याने  त्याची मांडणी पडद्यावर योग्यरित्या होणे, हे खूप महत्वाचे असते आणि ही जबाबदारी लक्ष्मण उतेकर, ऋषी वीरमानी, कौस्तुभ सावरकर, उन्मन बनकर आणि ओंकार महाजन (Omkar Mahajan) यांनी लीलया पेलली आहे. ओंकार महाजन यांची ही पहिली फिचर फिल्म असल्याने त्यांच्यासाठी हा खास अनुभव होता. त्यांचा हा आनंददायी क्षण त्यांनी सर्वांसोबत शेअर केला आहे.

ओंकार महाजन म्हणतात, ”फिचर फिल्म म्हणून हा माझा पहिला चित्रपट आणि पहिलाच चित्रपट इतक्या नामवंतांसोबत करायला मिळणे, यासाठी मी स्वतःला खूप नशीबवान समजतो. यापूर्वी लक्ष्मण सरांसोबत मी असोसिएट म्हणून काम केले आहे. त्यामुळे या प्रोजेक्टसाठी त्याने पहिला फोन मला केला. मग हळूहळू त्यात एकेक जण सहभागी झाले. ऋषी सरांचे हिंदीवर प्रभुत्व असल्याने, कौस्तुभने यापूर्वी ‘लोकमान्य’साठी संवाद लिहिले आहेत, त्याचा इतिहासाचा अभ्यास आहे. उन्मननेही कौस्तुभसोबत काही चित्रपट केले आहेत.

तर या सगळ्यांना घेऊन आमची एक टीम तयार झाली. कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊनपासून आमचे या चित्रपटावर काम सुरु झाले. सुरुवातीच्या काळात आमचे फक्त व्हिडीओ कॉन्फरन्सवर काम सुरु होते. साधारण दोन अडीच वर्षं आम्ही कथा, पटकथेवर काम केले आणि अखेर आज आमचा ‘छावा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

विकी कौशलसारख्या अष्टपैलू अभिनेत्यासोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल ओंकार महाजन म्हणतात, ” विकी आणि आमच्या टीमचे पहिले संभाषण चित्रीकरण सुरु व्हायच्या आधी झाले होते. विकी पिअर्सिंग करण्यासाठी आला होता आणि स्क्रिप्टवर काम करत बसलो होतो. साधारण २०-२२ दिवसांनी चित्रीकरण सुरु होणार होते. आमच्यासाठी त्याला भेटण्याचा अनुभव कमाल होता. आम्ही तसे नवीन आहोत. मात्र विकी एक प्रसिद्ध अभिनेता आहे. असं असतानाही ज्या पद्धतीने तो आमच्यासोबत वागत, बोलत होता. त्याला तोड नाही.

VIDEO : मोठं संकट… शुद्ध आणि स्वच्छ हवा पाहिजे, लाईफस्टाइल कोच ल्यूक कोउटिन्होचं मुख्यमंत्र्‍यांना आवाहन

चित्रीकरणादरम्यानही आम्ही प्रत्येक सेटवर असायचो. सेटवरही तो आमच्यासोबत सौजन्यतेने वागायचा. त्याच्यात काहीतरी जादू आहे. सेटवरही तो स्वतः येऊन मिठी मारणार, चौकशी करणार. तो एक अभ्यासू आणि गुणी  अभिनेता आहे. त्याचे मराठीबाबत काही प्रश्नही असायचे. बऱ्याचदा आमच्यात याबद्दल चर्चाही व्हायची. त्यामुळे विकी कौशलसोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान होता.

follow us