Download App

R Madhavan: आर. माधवन आगामी सिनेमात सायकोलॉजिकल थ्रिलर मध्ये दिसणार ?

R Madhavan New Film: “द रेल्वे मेन” (The Railway Men) या बहुचर्चित वेब सीरिज मधून चाहत्यांची मन जिंकत आर माधवन (R Madhavan) पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित करून तो पुन्हा एकदा नव्या प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी सज्ज होणार आहे. इंडस्ट्रीतील नव्या चर्चा वरून आर माधवन पुन्हा एकदा सायकॉलॉजिकल थ्रिलरमध्ये दिसणार असल्याचं बघायला मिळणार आहे.


यामध्ये तब्बल 8 वर्षांनी कंगना राणौत (Kangana Ranaut), तिच्या हिट रोमँटिक कॉमेडी “तनु वेड्स मनू रिटर्न्स” मधील सहकलाकारासह तो दिसणार आहे. या बातम्यांनी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली तर लवकरच याबद्दल अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती सांगितली आहे.

“द रेल्वे मेन” मधील आर. माधवनच्या भूमिकेने चाहत्यांचा मन जिंकून घेतल आहे. आर माधवन आगामी शशिकांतच्या आगामी क्रिकेट ड्रामा चित्रपट ‘टेस्ट’ मध्ये मोठ्या पडद्यावर लवकरच झळकणार आहे.

आठ वर्षानंतर आर माधवनसोबत शेअर करणार स्क्रिन

कंगना आणि आर माधवन यांनी 2015 मध्ये रिलीज झालेल्या ‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’ या सिनेमानंतर आता सायकॉलॉजिकल थ्रिलर सिनेमामधून कंगना आणि आर माधवन हे चाहत्यांचे मनोरंजन करणार आहेत. अजून कंगनानं तिच्या या आगामी सिनेमाच्या नावाची माहिती चाहत्यांना दिली नाही. कंगना आणि आर माधवन यांनी ‘तनु वेड्स मनु या सिनेमात देखील एकत्र काम केलं आहे. आता त्यांना पुन्हा एकत्र स्क्रिन शेअर करताना पाहण्यास चाहते खूपच उत्सुक झाले आहे.

Salman Khan : ‘ममतांचं घर माझ्या घरापेक्षा’.. सलमान खानच्या खुलाशाने सगळेच अवाक

कंगनाचे आगामी सिनेमा

कंगना ही लवकरच ‘इमर्जन्सी’ (Emergency) या सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. तसेच कंगनाच्या या आगामी सायकॉलॉजिकल थ्रिलर सिनेमाची देखील चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Tags

follow us