Rahul Gandhi हे 3 इडियट्सप्रमाणे आईच्या महत्त्वाकांक्षेचे बळी; कंगनाचा टोला

Rahul Gandhi Criticize By Kangana Ranaut : राहुल गांधी ( Rahul Gandhi ) आणि प्रियांका गांधी ही भावंड 3 इडियट्स ( 3 Iditots ) चित्रपटाप्रमाणे आईच्या महत्वाकांक्षेला बळी पडलेले मुलं आहेत. अशी टीका अभिनेत्री कंगना रनौतने ( Kangana Ranaut ) केली आहे. दरम्यान भाजपच्या प्रत्येक निर्णयाचं समर्थन करणारी कंगना, विरोधकांना थेट शिंगावर घेणारी कंगना लोकसभेच्या […]

Rahul Gandhi हे 3 इडियट्सप्रमाणे आईच्या महत्त्वाकांक्षेचे बळी; कंगनाचा टोला

Rahul Gandhi

Rahul Gandhi Criticize By Kangana Ranaut : राहुल गांधी ( Rahul Gandhi ) आणि प्रियांका गांधी ही भावंड 3 इडियट्स ( 3 Iditots ) चित्रपटाप्रमाणे आईच्या महत्वाकांक्षेला बळी पडलेले मुलं आहेत. अशी टीका अभिनेत्री कंगना रनौतने ( Kangana Ranaut ) केली आहे. दरम्यान भाजपच्या प्रत्येक निर्णयाचं समर्थन करणारी कंगना, विरोधकांना थेट शिंगावर घेणारी कंगना लोकसभेच्या रिंगणात उतरली आहे. कंगनाला भाजपनं हिमाचल प्रदेशातून उमेदवारी जाहीर केली आहे.

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ सिनेमाचं तगडं बजेट; अक्षय कुमार, टायगर श्रॉफ यांच्या फीचा आकडा थक्क करणारा

त्या दरम्यान कंगनाने इंडिया टुडे या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी बोलताना कंगना म्हणाली की, ज्याप्रमाणे आपण थ्री इडियट्स चित्रपटांमध्ये पाहिले की, मुलांना आपल्या पालकांच्या इच्छांसाठी बळी पडावे लागते. त्याचप्रमाणे राहुल गांधी हे देखील आईच्या महत्वकांक्षेला बळी पडलेल्या मुलगा आहेत.

भावना गवळी बहीणच, मला समजून घेईल; राजश्री पाटलांनी व्यक्त केला विश्वास

तसेच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी राजकारणात सक्रिय राहण्यासाठी आईकडून दबाव टाकला जातो. या उलट दोघांना त्यांचे जीवन जगण्याची मुभा द्यायला हवी होती. त्यामुळेच राहुल गांधी यांचं वय 50 च्या पेक्षा जास्त असूनही वारंवार त्यांना युवा नेते म्हणून पुढे आणलं जात आहे. मात्र दबावामुळे ते एकटे पडले आहेत.

अडचणीच्या काळात साथ देणारा ‘माधव’ पॅटर्न : भाजपचा हुकमी एक्का पुन्हा चर्चेत…

त्यामुळे गांधी कुटुंबाने त्यांच्या मुलांना इतर क्षेत्रात काम करू द्यायला पाहिजे होते. जसं की अभिनय क्षेत्रातही काम करायला हरकत नव्हते. कदाचित ते चांगले अभिनेते ही झाले असते. तसेच त्यांच्या आईकडेही पैशांची कमतरता नव्हती. एक अफवा अशी देखील होती की राहुल गांधी एका महिलेच्या प्रेमात होते. मात्र त्यांना तिच्याशी लग्न करता आले नाही.

तर कंगनाला हिमाचलच्या मंडी मतदार संघातून दिेलेल्या उमेदवारीमुळे कंगना राजकारणात येणाच्या चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे. कंगनाने आतापर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या भूमिकांमुळे तिला अनेक पुरस्कारांनीही गौरवण्यात आले आहे. मात्र, ती करत असलेली विधानांमुळे तिला ‘पंगा’ गर्ल म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

Exit mobile version