Download App

Ram Mandir: साऊथ सुपरस्टार राम चरणला राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण; म्हणाला…

  • Written By: Last Updated:

Ram Mandir Consecration: सध्या राम मंदिर (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाबद्दल (Pran Pratishtha Ceremony) सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. अयोध्येत (Ayodhya) होणाऱ्या या दिमाखदार कार्यक्रमासाठी मनोरंजन जगतातील सर्व सेलिब्रिटींना निमंत्रण देण्यात आले आहे. आता ग्लोबल स्टार राम चरण (Ram Charan) आणि त्यांची पत्नी उपासना यांना 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी विशेष आमंत्रण मिळाले आहे. 12 जानेवारी रोजी आरएसएस नेते सुनील आंबेकर यांनी व्यक्तिश: साऊथ सुपरस्टार राम चरणला निमंत्रण दिले आहे.


अभिनेत्याला निमंत्रण देण्यासाठी सुनील आंबेकर हैदराबाद येथील अभिनेत्याच्या घरी गेले. या प्रसंगाचा नवीन फोटो सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनला आहे, यामध्ये राम, उपासना आणि सुनील एकत्र दिसत आहेत. या कार्यक्रमाला केवळ भाविकच नाही तर अनेक सेलिब्रिटी, राजकीय नेते, उद्योगपती आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचीही उपस्थिती अपेक्षित असल्याचे बघायला मिळणार आहे.

फोटोमध्ये राम चरणच्या हातात या विशेष कार्यक्रमाचे निमंत्रण पत्रही दिसत आहे. दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआरआर’ सिनेमात भगवान रामाच्या प्रतिमेत दिसणारे राम चरण या विशेष कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे.

येत्या 22 जानेवारीची तारीख भारतीय इतिहासात सुवर्ण तारीख म्हणून नोंदवली जाणार आहे. या दिवशी उत्तर प्रदेशातील अयोध्येत बांधलेल्या भव्य राम मंदिराच्या अभिषेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये देशभरातील राजकारणी आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा मेळा भरणार आहे.

सिनेमा हे माझं जग, तर थिएटर…! दिग्दर्शक रमेश सिप्पी यांचा ‘एशियन कल्चर’ पुरस्काराने सन्मान

साऊथच्या ‘या’ सेलिब्रिटींनाही मिळाले आमंत्रण: राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण मिळालेले राम चरण हे पहिले नाव नाही. राम चरणपूर्वी दिग्गज अभिनेते रजनीकांत आणि धनुष यांना देखील या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. इतकंच नाही तर अजय देवगण, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, माधुरी दीक्षित आणि रणबीर कपूर यांसारख्या बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना राम मंदिर उद्धाटनाचे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

follow us