Ram Mandir : 22 जानेवारीला असंख्य भारतीयांसह सरस्वती देवींच्या कुटुंबीयांची ‘ती’ प्रतिक्षा संपणार!
Ram Mandir : 22 जानेवारीला अयोध्येमध्ये भव्य अशा प्रभु श्रीरामांच्या मंदीराचं (Ram Mandir) उद्घाटन होईल अन् प्रत्येक भारतीयांची शतकानुशतकांपासूनची प्रतीक्षा संपेल. पण या उद्घाटनामुळे आणखी एक प्रतिक्षा संपेल ती झारखंडच्या सरस्वती देवी यांच्या कुटुंबीयांची. काय आहे सरस्वती देवी यांच्या कुटुंबीयांची ही प्रतिक्षा चला तर जाणून घेऊ सविस्तर…
राजकारणात धर्म आणू नये, मात्र भाजपचे राजकारण धर्माच्या आधारावर; नाना पटोलेंचं टीकास्त्र
ही गोष्ट आहे 31 वर्षांपूर्वीची जेव्हा 1992 ला कारसेवकांकडून बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्यात आला होता. त्याचवेळी तिकडे झारखंडमध्ये धनबाद या ठिकाणच्या सरस्वती देवी यांनी एक प्रतिज्ञा केली. ही प्रतिज्ञा अशी होती की. जोपर्यंत शरयू नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या पवित्र शहर अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं निर्माण होत नाही. तोपर्यंत त्या मौनव्रत धारण करतील. आणि तसंच झालं तब्बल 31 वर्षांच्या त्यांच्या मौनव्रतानंतर अखेर 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्याच दिवशी सरस्वती देवी त्यांचे मौनव्रत सोडणार आहेत. सरस्वती देवी यांचे वय आता 85 वर्षांच आहे.
PM Modi कडून शिंदे, फडणवीस, अजितदादांचे कौतुक तर, भिजत घोंगड्या प्रकल्पांवरून कॉंग्रेस टार्गेट
सरस्वती देवी यांचे नातेवाईक सांगतात की, त्या नेहमी आयोध्यामध्ये येत होत्या. नृत्य गोपालदास यांच्याकडून त्यांना श्रीरामांचे भक्तीची प्रेरणा मिळाली होती. याच दरम्यान त्यांनी ही प्रतिज्ञा घेतली होती. त्यांच्या याच व्रतामुळे आयोध्येत त्या मौनी मातेच्या नावाने ही प्रसिद्ध आहेत. मौनव्रत असल्याने एक तर त्या हातवारे करून बोलतात किंवा सांगायला अवघड असेल तर लिहून सांगतात.
प्रवास होणार वेगवान… अटल सेतूवरून प्रवास करण्यासाठी कोणत्या वाहनाला किती टोल?
जेव्हापासून मौनव्रत धारण केलं होतं. तेव्हापासून ते 2020 ला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते जेव्हा राम मंदिराचे भूमिपूजन झालं होतं. तोपर्यंत त्या दुपारी एक तास बोलायच्या. मात्र त्यानंतर त्यांनी पूर्णपणे मौन धारण केलं. असं सरस्वती देवीचे 55 वर्षीय पुत्र राम अग्रवाल सांगतात. सरस्वती देवी यांना दोन पुत्र आहेत. त्यापैकी दुसरे म्हणजे नंदलाला अग्रवाल. नंदलाल यांच्या पत्नी सांगतात, माझ्या लग्नाच्या काही महिन्यानंतरच त्यांनी मौन धारण केलं. तसेच त्या पहाटे चार वाजता उठतात. सहा ते सात तास ध्यान करतात. 2001 मध्ये त्यांनी चित्रकुट या ठिकाणी सात महिने तपश्चर्य देखील केली होती. त्या प्रभू रामांच्या पूजेत तल्लीन राहतात.
त्यामुळे 22 जानेवारीला होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या उद्घाटन सोहळा सरस्वती देवी यांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा असेल. कारण त्या दिवशी सरस्वती देवी त्यांचं 31 वर्षांपासूनच मौन व्रत सोडतील. या सोहळ्यासाठी सरस्वती देवींना निमंत्रण मिळालं असून आठ जानेवारीलाच त्या धनबादवरून अयोध्येला रवाना झाल्या आहेत.