Download App

Box Office Collection: पहिल्या दिवशी रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ नं केला 100 कोटींचा आकडा पार!

  • Written By: Last Updated:

Animal Box Office Collection Day 1: अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) ‘अ‍ॅनिमल’ (Animal Movie) हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. सध्या सगळीकडे या सिनेमाचा बोलबाला बघायला मिळत आहे. ( Box Office Collection) या सिनेमाला रिलीजच्या पहिल्याच दिवशी चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अनेक जण सिनेमातील रणबीर कपूरच्या अभिनयाचं तोंडभरून कौतुक करत आहेत. अॅनिमल या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी मोठा गल्ला कमावला आहे. ‘अॅनिमल’ सिनेमानं रिलीजच्या पहिल्या दिवशी किती कमाई केली?


दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित (Sandeep Reddy Vanga) ‘अॅनिमल’ सिनेमाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. अनेकांनी या सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो बघितला आहे. ‘Sacnilk नं दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, ‘ॲनिमल’ नं आगाऊ बूकिंग द्वारे 61 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सगळ्यात जास्त या सिनेमानं एनसीआरमध्ये कमाई केली. पहिल्या दिवशी सिनेमागृहातील गर्दी विषयी सांगायचं झालं तर हा 62.47 टक्के थिएटर फूल होते. तर नाइट शोज 84.07 टक्के थिएटर भरलं होतं.

यापैकी हिंदी भाषेमध्ये सिनेमाने 50.00 कोटींचा गल्ला कमावला आहे, तर तेलुगूमध्ये सिनेमाचे कलेक्शन 10 कोटी रुपये आहे. या सिनेमाने तमिळमध्ये 0.4 कोटी रुपये, कन्नडमध्ये 0.09 कोटी रुपये आणि मल्याळममध्ये 0.01 कोटी रुपयांचे कलेक्शन केलं आहे. ‘अॅनिमल’ या सिनेमाने ओपनिंग-डे कलेक्शनमध्ये शाहरुख खानच्या पठाण , सनी देओलच्या गदर 2 आणि भाईजानच्या ‘टायगर 3’ सिनेमाचा अनोखा रेकॉर्ड मोडला आहे. पठाण या सिनेमानं ओपनिंग-डेला 57 कोटींचा गल्ला कमावला आहे. तर गदर 2 या सिनेमानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 40.10 कोटींची कमाई केली तसेच भाईजानच्या टायगर-3 या सिनेमानं ओपनिंग-डेला 44.50 कोटींची कमाई केली.

Salaar Trailer: अखेर प्रतीक्षा संपली! प्रभासच्या ॲक्शन सीन्सने ‘सालार’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज

अॅनिमल हा रणबीरच्या करिअरमधील ओपनिंग-डेला सर्वाधिक कलेक्शन करणारा पहिला सिनेमा ठरला आहे. ब्रह्मास्त्र – पार्ट वन या रणबीरच्या सिनेमानं रिलीजच्या पहिल्याच दिवशी 36 कोटींची कमाई केली. तर त्याच्या संजू या सिनेमानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 34.75 कोटींचा गल्ला कमावला होता. अॅनिमल या सिनेमात रणबीरसोबतच रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल या मुख्य कलाकारांनी देखील महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Tags

follow us