Download App

Sushant Sing Rajput : ‘खोट प्रेम का दाखवते? प्रेम होत तर… ‘ रियाने शेअर केला सुशांतसोबतचा व्हिडीओ, चाहते संतप्त

Sushant Sing Rajput : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Sing Rajput) निधनाला आज 3 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त त्याची अत्यंत जवळची मैत्रीण असलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे. अनेक जण तिला खंबीर राहण्याचा सल्ला देत आहेत. मात्र या व्हिडीओमुळे तिला सुशांत सिंगच्या चाहत्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे. ( Rhea Chakraborty troll on Sushant Sing Rajput video post )

रोहित शर्माच्या कसोटी कर्णधार पदाबाबत, सौरव गांगुलीचे मोठे विधान

या व्हिडीओमध्ये रिया आणि सुशांत हे शेजारी शेजारी बसून रोमॅंटीक पोज देताना दिसत आहे. त्यांच्या खास व्हिडीओला विश यू वेअर हेअर गाणे देखील आहे. सुशांतच्या आठवणी ताज्या करण्यासाठी तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र या व्हिडीओमुळे तिला सुशांत सिंगच्या चाहत्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे.

काय आहे हा व्हिडीओ?

14 जून 2020 रोजी सुशांत सिंग राजपूत त्याच्या वांद्रे अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या निधनाने संपूर्ण बॉलीवूडला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर सुशांतच्या चाहत्यांनी त्याच्या आत्महत्येचे प्रकरण चांगलेच गाजवले. आता 3 वर्षांनी 12 जून रोजी या प्रकरणावर सुनावणी झाली आहे. मात्र या घटनेला 3 वर्ष उलटली तरी देखील अद्याप त्याला न्याय मिळालेला नाही.

‘नुसत्या नकला काढून मुख्यमंत्री होता येणार नाही’; आव्हाडांनी राज ठाकरेंना डिवचलं!

पवित्र रिश्ता मालिकेतून त्याने अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवला. त्या यातून मालिकेतील त्याला चांगली प्रसिद्धी मिळाली. तो घराघरात पोहचला. याचवेळी त्याच्या आणि अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या नात्याची देखील चर्चा गाजली. त्यानंतर ते विभक्त देखील झाले. मात्र सुशांत अभिनयात शिखर चढत यश मिळवत होता. त्यामध्ये त्याचे एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी, दिल बेचारा, पीके, काय पो चे, छिछोरे हे त्याचे चित्रपट विशेष गाजले.

Tags

follow us