Ishq Vishk Rebound: अखेर ‘इश्क विश्क रिबाउंड’चे दुसरे गाणे रिलीज, पश्मीना आणि रोहित रोमँटिक मूडमध्ये

अभिनेता रोहित सराफ (Rohit Saraf) स्टारर ‘इश्क विश्क रिबाउंड’च्या (Ishq Vishq Rebound) शीर्षक गीताने अभिनेत्याच्या चाहत्यांना नॉस्टॅल्जिक प्रवासात नेले आहे.

Ishq Vishk Rebound: अखेर 'इश्क विश्क रिबाउंड'चे दुसरे गाणे रिलीज, पश्मीना आणि रोहित रोमँटिक मूडमध्ये

Ishq Vishk Rebound: अखेर 'इश्क विश्क रिबाउंड'चे दुसरे गाणे रिलीज, पश्मीना आणि रोहित रोमँटिक मूडमध्ये

Ishq Vishk Rebound Song Release: अभिनेता रोहित सराफ (Rohit Saraf) स्टारर ‘इश्क विश्क रिबाउंड’च्या (Ishq Vishq Rebound) शीर्षक गीताने अभिनेत्याच्या चाहत्यांना नॉस्टॅल्जिक प्रवासात नेले आहे. चाहत्यांना ‘इश्क विश्क प्यार व्यार’ सिनेमाने आकर्षित केल्यानंतर ‘इश्क विश्क रिबाउंड’च्या निर्मात्यांनी चित्रपटाचा दुसरा ट्रॅक आउट केला आहे. ‘सोनी सोनी’ शीर्षक (Soni Soni Song) असलेल्या या गाण्यात चॉकलेट बॉय रोहित सराफ आणि त्याची सहकलाकार पश्मिना रोशन (Pashmina Roshan) रोमँटिक मूडमध्ये पाहायला मिळत आहेत.


पहिल्या फ्रेमपासूनच रोहितची इनेर्जी आणि किलर मूव्हने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. रोहितची पश्मीनासोबतची केमिस्ट्रीही कमालीची दिसतेय. रोमँटिक लीड म्हणून ‘इश्क विश्क रिबाउंड’ हा रोहितचा पहिला थिएटर रिलीझ आहे. ‘सोनी सोनी’ सह, रोहितने त्याला नॅशनल क्रश का म्हटले जाते हे सिद्ध केले आहे. हे गाणे दर्शन रावल, जोनिता गांधी आणि रोचक कोहली यांनी गायले आहे, जो संगीतकार देखील आहे.

जेव्हापासून हा ट्रॅक सोशल मीडियावर आला तेव्हापासून, चाहते ‘इश्क विश्क रिबाउंड’बद्दल उत्साह व्यक्त करत आहेत आणि आकर्षक आणि संस्मरणीय कामगिरी देण्याच्या रोहितच्या सातत्यपूर्ण क्षमतेबद्दल त्यांचे कौतुक करत आहेत. जसजसा ‘इश्क विश्क रिबाउंड’ 21 जूनला रिलीज होणार आहे.

Aparshakti Khurana: अभिनेता अपारशक्ती खुराणाच्या ‘त्या’ फोटोमुळे चर्चेला उधाण

तसतसे या निपुण अविनाश धर्माधिकारी-दिग्दर्शित रोम-कॉम भोवती उत्साह निर्माण होत आहे. ‘इश्क विश्क रिबाउंड’ च्या पलीकडे, रोहित ‘मिसमॅच्ड ३’ मध्ये त्याचे लाडके पात्र ‘ऋषी सिंग शेखावत’ पुन्हा साकारणार आहे. त्यांच्याकडे धर्मा प्रॉडक्शनचे ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ देखील आहे.

Exit mobile version