Rohit Saraf च्या ‘इश्क विश्क रिबाउंड’चं टायटल ट्रॅक आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता वाढली

Rohit Saraf च्या  ‘इश्क विश्क रिबाउंड’चं टायटल ट्रॅक आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता वाढली

Title Track out of Rohit Saraf film Ishq vishq rebound : रोहित सराफचे ( Rohit Saraf ) चाहते ‘इश्क विश्क रिबाउंड’ ( Ishq vishq rebound ) मध्ये त्याला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक असताना आता ‘इश्क विश्क प्यार व्यार’ या चित्रपटाचा शीर्षक ट्रॅक त्याने सोशल मीडिया वर शेअर केला आहे. शाहिद कपूर-स्टार ‘इश्क विश्क’ मधील OG ट्रॅकमध्ये गोड निरागसता आणि अप्रतिम डान्स मूव्ह सोबत रोहित सराफ त्याच्या चॉकलेट बॉय चार्मने पडद्यावर राज्य करणार आहे.

त्यांना 151 पेक्षा जास्त जागा मिळाल्यास माझ्या चेहऱ्यावर शेण पडेल; प्रशांत किशोरांचा दावा कुणाबद्दल?

यामध्ये पश्मिना रोशन, जिब्रान खान आणि नाइला ग्रेवाल यांच्यासह अभिनेता त्याची ऑन-स्क्रीन उपस्थिती यातून दाखवणार आहे. टीझर रिलीज झाल्यापासून गाण्याच्या झलकने रोहितच्या चाहत्यांमध्ये आणि संगीत रसिकांमध्ये जोरदार चर्चा निर्माण केली होती. चाहत्यांना खात्री आहे की हा चित्रपट अभिनेताला बॉलिवूडचा पुढचा रोमँटिक हिरो म्हणून स्थापित करेल. टायटल ट्रॅक चाहत्यांना नॉस्टॅल्जिक ट्रिपवर घेऊन जाणार आहे.

Pushpa 2 OTT : रिलीज आधीच ‘पुष्पा 2’ने कमावले 1200 कोटी? ओटीटीसाठीची डील पक्की!

‘इश्क विश्क प्यार व्यार’ हे गाणे कमालीचं सुंदर आहे यात शंका नाही. 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या OG ट्रॅकला ट्विस्ट दिला आहे. निपुण अविनाश धर्माधिकारी दिग्दर्शित आणि रिलीज होण्याच्या तयारीत असलेल्या या चित्रपटाकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

21 जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त रोहित ‘मिसमॅच 3’ मध्ये ऋषी शेखावत यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तो सध्या त्याच्या शशांक खेतान-दिग्दर्शित ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ साठी शूटिंग करत आहे, ज्यामध्ये वरुण धवन, जान्हवी कपूर आणि सान्या मल्होत्रा ​​देखील दिसणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज