इश्क विश्क रिबाउंडच्या स्क्रिनिंगला रोहित सराफची हजेरी, हाऊसफुल शो पाहून भारावला अभिनेता

इश्क विश्क रिबाउंडच्या स्क्रिनिंगला रोहित सराफची हजेरी, हाऊसफुल शो पाहून भारावला अभिनेता

Ishq Vishk Rebound : अभिनेता रोहित सराफ (Rohit Saraf) जिब्रान खान,आणि नायला ग्रेवाल यांचा इश्क विश्क रिबाउंड हा बहुचर्चित चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून अभिनेता रोहित शर्माने एका थिएटला भेट दिली. आपल्या चित्रपटाला मिळणार प्रतिसाद पाहून रोहित शर्मा भारावून गेला.

Manoj Jarange : मोठी बातमी! अचानक मनोज जरांगेंची प्रकृती खालावली 

इश्क विश्क रिबाउंड हा 2003 साली प्रदर्शित झालेल्या इश्क विश्कचा सीक्वल आहे. हृतिक रोशनची बहीण पश्मिना रोशनने या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
या चित्रपटाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी या चित्रटाचे शो हाऊसफूल झाले आहेत. दरम्यान, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतचर रोहित सराफ या अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करण्यासाठी थिएटरला भेट दिली. थिएरलमध्ये अभिनेत्याला पाहून चाहत्यांचा आनंद द्विगुणणित झाला. तर आपल्या चित्रपटाला मिळणार प्रतिसाद पाहून रोहित सराफही भारावून गेला. या चित्रपटात रोहितने राघव हे पात्र साकारल आहे. त्याच्या या भूमिकेचं चाहत्यांकडून कौतुक होतंय. दरम्यान, यावेळी चाहत्यांनी रोहित सराफसोबत सेल्फी काढून त्याचे ऑटोग्राफ देखील घेतली आहेत.

‘सगेसोयरे’ मुळेच घात; ही मागणी कायद्याला धरून आहे का ? आरक्षणाचे अभ्यासक सराटेंचे रोखठोक मत 

‘इश्क विश्क रिबाउंड’ या वर्षातील सर्वोत्कृष्ट रोमँटिक चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाला पहिल्या दिवशी तर चांगलाच प्रतिसाद मिळाला नाही. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1 कोटींची कमाई केली होती. इश्क विश्क रिबाउंडचे आतापर्यंत एकूण 1.81 कोटी रुपयांचे कलेक्शन झाले आहे.

दरम्यान, लवकरच रोहित सराफ वरुण धवन, जान्हवी कपूर आणि सान्या मल्होत्रा यांच्या भूमिका असलेल्या धर्मा प्रॉडक्शनच्या ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ मध्येही झळणणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज