Download App

Sai Tamhankar: चर्चा तर होणारच! ‘क्राइम बीट’मधला सई ताम्हणकरचा लेस्बियन किसिंग सीन व्हायरल

Sai Tamhankar: मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीच्या अभिनेत्री तसेच हिंदीमध्ये देखील जोरदार नाव गाजवत आहे. (Sai Tamhankar) सिनेमा असो किंवा ओटीटी प्लॅटफॉर्म (OTT platform) या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या अभिनयाची चर्चा जोरदार रंगत असल्याचे दिसून येते. अभिनेत्रींना बड्या बॅनरखाली काम करण्याची संधी मिळत आहे. तसेच ती तिच्या कामाची छाप सोडत आहे. अभिनेत्री सई ताम्हणकर देखील अशाच अभिनेत्रींपैकी एक असल्याची चर्चा होत आहे.


हिंदी सिनेमा आणि सीरिजमध्ये काम केल्यावर सईचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या चाहत्यांसाठी आता आनंदाची बातमी समोर आली आहे. अभिनेत्रीच्या ‘क्राइम बीट’ (Crime Beat) या आगामी सीरिजचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये तिचा तगडा स्टारकास्ट बघायला मिळणार आहे. मात्र टीझरमध्ये सईने दिलेल्या लेस्बियन किसिंग सीनची चर्चा खूपच होत आहे. ‘क्राइम बीट’ सीरिजमध्ये सई ताम्हणकरबरोबर साबीक सलीम, राहूल भट्ट, आदिनाथ कोठारे, सबा आझाद, किशोर कदम यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका असल्याचे या टीजरवरुन स्पष्ट झाले आहे.

या सीरिजमध्ये साकीब एका पत्रकाराच्या भूमिकेमध्ये आदिसुं आला आहे, तो एका स्टोरीच्या फॉलोअपवर असतो. तो निडर होऊन या स्टोरीचा माग काढत असतो, तर केनडी फेम अभिनेता राहुल भट्ट खलनायकाच्या भूमिकेमध्ये दिसला आहे. तसेच कॉमनवेल्थ गेम्समधील भ्रष्टाचार आणि त्याचा राजकारणाशी असणारा संबंध याविषयी या टीझरमध्ये भाष्य करण्यात आले आहे. ‘क्राइम बीट’मध्ये आदिनाथ कोठारे एका इमानदार पोलीस ऑफिसरच्या भूमिकेमध्ये दिसून आला आहे. आदिनाथ देखील अॅक्शन मोडमध्ये दिसून आला आहे. हृतिक रोशनची गर्लफ्रेंड अभिनेत्री सबा आझाद देखील या सीरिजमध्ये आपली चांगलीच भूमिका साकारली आहे.

Box Office Collection : ‘जरा हटके जरा बचके’चा दबदबा, चित्रपटानं पाचव्या दिवशी केली कोटींची कमाई

दरम्यान या सीरिजच्या टीझरमध्ये दाखवण्यात आलेले क्राइमशी संबंधित कथानक, पत्रकारिता, भ्रष्टाचार या गोष्टी तर दिसून आले आहेतच. मात्र सईच्या लिपलॉक सीनने विशेष लक्ष वेधून घेतले आहे. तिचा बोल्ड अवतार हा सीरिजमध्ये देखील बघायला मिळाला आहे . सईची भूमिका नेमकी काय आहे, याचा उलगडा या टीझरमधून झाला नाही. सईच्या इतर काही बोल्ड सीनबरोबर स्विमिंग पूलमध्ये तिचा खूपच बोल्ड लेस्बियन लिपलॉक सीनची एक झलक देखील या टीझरमध्ये बघायला मिळाली आहे. तसेच ‘क्राइम बीट’चा टीझर समोर आल्यानंतर चाहत्यांनी सीरिजविषयी मोठी उत्सुकता व्यक्त केली आहे.

दरम्यान सुधीर मिश्रा आणि संजीव कौल यांची सीरिज Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे, अद्याप कधी प्रदर्शित होणार याची तारीख मात्र आणखी समोर आली नाही. अभिनेत्री प्रिया बापटची मुख्य भूमिका असणारी डिज्नी प्लस हॉटस्टारची वेब सीरिज ‘सिटी ऑफ ड्रिम’चा तिसरा सीझन गेल्या काही दिवसाखाली प्रदर्शित करण्यात आला आहे. या सीरिजमध्ये प्रियासह अनेक मराठी कलाकार यामध्ये आहेत. दरम्यान या सीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये प्रियाचा लेस्बियन किसिंग सीन चांगलाच चर्चेत होता.

Tags

follow us

वेब स्टोरीज