Download App

दौलतरावसोबत सई ताम्हणकरची खास स्पेन सफर, बर्थ डेचं केलं खास सेलिब्रेशन

Sai Tamhankar : मराठीसह हिंदीतही लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या भूमिकांमुळे आणि स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. तिची स्टाईल नेहमीच हटके आणि लक्ष वेधून घेणारी असते. तर नुकतचं तिच्या अभिनयासाठी तिला आयफा पुरस्कार देखील देण्यात आला आहे. त्यानंतर आता सईने तिच्या बर्थ डेचं स्पेनमध्ये सेलिब्रेशन केलं आहे. ( sai Tamhankar Spain Tour with Daulatrao special birthday celebration )

Prakash Ambedkar : औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहताच दंगली थांबल्या…

सई ताम्हणकरने तिचा वाढदिवस स्पेन सारख्या सुंदर ठिकाणी साजरा केला. नुकतच सईने स्पेनच्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेतला. मात्र यावेळी तिच्यासोबत होती खास व्यक्ती. ही व्यक्ती म्हणजे सईचा बॉयफ्रेंड अनीश जोग. अनीश जोग हा निर्माता आहे. सध्या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगलेल्या असताना सोशल मिडीयावर दोघांच्या स्पेन ट्रीपची चर्चा आहे.

पवारांनी केली ती मुत्सद्देगिरी, शिंदेंनी केली ती बेईमानी कशी, फडणवीसांचा सवाल

सईने स्पेनमध्ये अनीशसोबत तिचा वाढदिवस साजरा केलाय. शिवाय या खास स्पेन ट्रिपचे फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. एवढच नाही तर सईही अनीशला तिचा दौलतराव म्हणते हे आता महाराष्ट्राला माहिती झालय. याच दौलतरावाने सईसाठी वाढदिवसानिमित्त खास बर्थडे पोस्टही केलीय. या पोस्टमध्ये त्याने सईला ड्रॅगन क्विन असं म्हटलय.

सईने या स्पेन ट्रीपचे खास क्षण सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. त्यापैकी एक पोस्ट मात्र भन्नाट चर्चेत आलीय. त्याचं कारणही खास आहे. या पोस्टमध्ये तिने मिर्च्यांचे फोटो शेयर केले आहेत. तिखट गोड स्पेन म्हणत तिने स्पेनमध्ये चक्क मिर्च्यांचा आस्वाद घेतल्याचं पाहायला मिळतय. स्पेनमधील या मिर्च्या सईमुळे चांगल्याच चर्चेत आल्यात.

सई ताम्हणकर आणि अनीष जोग यांच्या रिलेशनशिपचा खुलासा मागील वर्षी झाला होता. त्यानंतर दोघांच्या सोशल मिडीया पोस्ट चर्चेत आहेत. यातच त्यांची स्पेन ट्रीप लक्षवेधी ठरलीय. स्पेनमधील मॅड्रीड, बार्सेलोना सारख्या ठिकाणी सईने भेट दिलीय. शिवाय स्पेनमधील विविध पदार्थांचाही आस्वाद घेतलाय. सईसाठी ही तिची बर्थडे ट्रीपन नक्कीच खास ठरली असेल.

Tags

follow us