Download App

‘कितना समय लगेगा’?; जखमी अवस्थेत सैफने रिक्षा चालकाला विचारला होता प्रश्न; वाचा ‘त्या’ रात्रीचा थरार

Saif Ali Khan Attack : बॉलीवूड स्टार सैफ अली खानवर (Saif Ali Khan) गुरूवारी चाकूने हल्ला करण्यात आला  यानंतर त्याला रिक्षातून मुंबईतील

  • Written By: Last Updated:

Saif Ali Khan Attack : बॉलीवूड स्टार सैफ अली खानवर (Saif Ali Khan) गुरूवारी चाकूने हल्ला करण्यात आला  यानंतर त्याला रिक्षातून मुंबईतील लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. आता त्या चालकाने त्या रात्री घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली आहे.

ABP न्युजशी बोलताना रिक्षाचालक भजनसिंग म्हणाला की, आम्ही घराच्या दिशेने जात होते तेव्हा मला आवाज ऐकू आला. दूरवरून एक महिला रिक्षा-रिक्षा हाक मारत होती. म्हणून मी यू-टर्न घेतला आणि गेटकडे गेलो आणि माझी रिक्षा थांवबली तेव्हा रिक्षामध्ये तीन लोक येऊन बसले तेव्हा मी पहिले नव्हते की तो सैफ अली खान आहे. त्याने पँट आणि कुर्ता घातला होता. त्याच्या शरीरावर जखमा दिसत होते. त्यानंतर जेव्हा आम्ही रुग्णालयात पोहोचलो तेव्हा मी रिक्षा आपत्कालीन विभागाकडे थांबवली. तिथे एक रुग्णवाहिका उभी होती. आपत्कालीन स्थिती पाहता रुग्णवाहिका मागे सरकली आणि मी रिक्षापुढे नेली. जेव्हा सैफ जात होता तेव्हा मी पाहिले की माझ्या रिक्षेत एक स्टार बसला होता आणि तोही अशा अवस्थेत. असं रिक्षा चालक म्हणाला.

पुढे बोलताना रिक्षा चालक म्हणाला की, रिक्षेमध्ये सैफ स्वतः चालत आला होता. त्याच्या सोबत दोन – तीन महिला देखील होते आणि एक मुलगा होता. तसेच लीलावती रुग्णालयात सैफ स्वतः चालत गेला. त्याच्या मानेला गंभीर दुखापत झाली होती आणि सर्वत्र रक्तच रक्त होते. असं देखील रिक्षा चालक भजनसिंग म्हणाला. रिक्षेमध्ये सैफने आणखी किती वेळ लागणार असं विचारले होते तेव्हा फक्त 4-5 मिनिटे लागणार असं मी म्हटलं.

क्लासिक फिचर्स अन् पावरफुल इंजिनसह देशात आली पहिली सीएनजी स्कूटर

मी सैफ अली खान लवकर स्ट्रेचर आणा

सैफ रिक्षेमध्ये मुलासोबत इंग्रजीत बोलत होता आणि जेव्हा आम्ही रुग्णालयात पोहोचलो तेव्हा सैफने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सांगितले की मी सैफ अली खान आहे लवकर स्ट्रेचर आणा. अशी माहिती भजनसिंग रिक्षाचालकाने दिली. तर दुसरीकडे सध्या लीलावती रुग्णालयात सैफ अली खानवर उपचार सुरू असून डॉक्टरांनी सैफला आठ दिवस विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे.

follow us