Download App

सैफ अली खान प्रकरणात मुंबई पोलीस थेट मध्य प्रदेशात, एक संशयित ताब्यात

Saif Ali Khan Case : बॉलीवूड (Bollywood) अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) प्रकरणात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मोठी

  • Written By: Last Updated:

Saif Ali Khan Case : बॉलीवूड (Bollywood) अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) प्रकरणात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मोठी कारवाई करत मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh) एका संशयिताला अटक केली आहे. सध्या त्याची चौकशी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

बुधवारी रात्री अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला होता. सध्या त्याच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहे. उपचारा दरम्यान सैफच्या मणक्यातून चाकूचा एक भागही काढण्यात आला. त्याच्यावर आतापर्यंत  दोन शस्त्रक्रिया करण्यात आले आहे.

जेव्हा सैफ रुग्णालयात आला तेव्हा त्याच्या शरीरातून खूप रक्तस्त्राव झाला होता. जर जखम थोडी खोल असती तर अभिनेत्याच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. असं डॉक्टरांनी म्हटले आहे.

तर दुसरीकडे या प्रकरणात करीना कपूर खानने (Kareena Kapoor Khan) देखील जबाब नोंदवला आहे. करीनाने तिच्या जबाबात म्हटले आहे की, सैफसोबत झालेल्या भांडणादरम्यान हल्लेखोर खूप आक्रमक झाला आणि त्याने सैफवर चाकूने अनेक वार केले. मात्र, त्याने रूममध्ये ठेवलेल्या दागिन्यांना हातही लावला नाही आणि या घटनेनंतर बहीण करिश्मा कपूर तिला खार येथील तिच्या घरी घेऊन गेली.

इअरफोन खरेदी केले

तर दुसरीकडे या प्रकरणात मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफवर चाकूने वार केल्यानंतर आरोपीने इअरफोन्स खरेदी केले होते.संशयित आरोपी माझ्या दुकानात आला होता आणि त्याने 50 रुपयांचा एक इअरफोन विकत घेतला. अशी माहिती मुंबई पोलिसांना दुकानदाराने दिली.

follow us