फरार झालेले वाल्मिक कराड मध्य प्रदेशात?, कुठ मिळालं लोकेशन? काय आहे नक्की सत्यता?

  • Written By: Published:
फरार झालेले वाल्मिक कराड मध्य प्रदेशात?, कुठ मिळालं लोकेशन? काय आहे नक्की सत्यता?

Location of Valmik Karad : सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर वाल्मिक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा निकवर्तीय असल्याने (Valmik Karad) राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप मोठ्या प्रमाणावर होत आहेत. अशातच वाल्मिक कराड यांचं सध्याचं लोकेशन मध्य प्रदेशात असल्याचं बोलल जातय. दरम्यान, लोकेशन आता मिळण बंद झाल्याचीही चर्चा आहे.

मोठी घडामोड! वाल्मीक कराडच्या पत्नीची CID चौकशी; नेमकं कारण काय?

पत्नीची सीआयकडून चौकशी

अधिकची माहिती अशी की, वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा आहे. खंडणीच्या गुन्हा प्रकरणात सध्या वाल्मिक कराड फरार आहेत. दरम्यान, सीआयडीने वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांची चौकशी केली आहे. बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये जिथे सीआयडीचं पथक सकाळपासून काम करत आहे. त्यांनी दोन ते अडीच तास मंजिली कराड यांची चौकशी केली आहे. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलंय. गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड फरार आहेतच त्यानंतर त्यासंदर्भातील चौकशीचा भाग असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

सीआयडीकडून चौकशी

सीआयडीकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांचीही चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान, चौकशी झाल्यानंतर चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा जिल्हाध्यक्ष आहे आणि या दरम्यान धनंजय मुंडे यांच्या पीआरचं काम वाल्मीक कराड हे बघायचे. माझा त्यांचा संपर्क सुद्धा होत होता. मी त्यांना ओळखतो का हे विचारण्यासाठी मला आज पोलिसांनी बोलून घेतले होते, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube