Download App

सलमान खानच्या बिग बजेट सिनेमाला ब्रेक! ‘टायगर वर्सेस पठाण’ स्थगित

Salman Khan Movie Tiger vs Pathan Postponed : सलमान खानच्या (Salman Khan) बिग बजेट सिनेमाला ब्रेक लागला आहे. ‘टायगर वर्सेस पठान’ हा सिनेमा स्थगित करण्यात आल्याची माहिती मिळतेय. मुंबईतील एका फाइव स्टार हॉटेलमध्ये नुकत्याच झालेल्या सिकंदर चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये सलमान खानने त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल मोठे खुलासे (Tiger vs Pathan) केले. गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेली अॅटली आणि सलमानची बिग बजेट फिल्म (Bollywood News) सध्या स्थगित करण्यात आली आहे.

शाहरुख खानला जवानसारखा ब्लॉकबस्टर देणाऱ्या अॅटलीसोबत सलमान काम करणार, या बातमीने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली होती. मात्र, आता हे प्रोजेक्ट फंडिंगच्या अडचणींमुळे पुढे सरकू शकले नाही, असे खुद्द सलमान खानने स्पष्ट (Salman Khan Movie) केले. एका मोठ्या फिल्मसाठी अॅटली सलमान आणि रजनीकांत यांना एकत्र आणण्याच्या तयारीत होता. मात्र, बजेट खूपच वाढल्यामुळे निर्मात्यांनी हा प्रोजेक्ट तूर्तास थांबवला आहे. एक काळ होता जेव्हा आम्ही हे प्रोजेक्ट करण्याच्या तयारीत होतो. आम्ही खूप प्रयत्न केले, पण काही गोष्टी जुळून आल्या नाहीत, असे सलमान म्हणाला.

IMD अलर्ट! पुढील 48 तासांत मुसळधार पाऊस पडणार, ‘या’ जिल्ह्यांत…

सलमान खानने आणखी एक मोठा खुलासा केला की, टायगर वर्सेस पठान हा मेगा प्रोजेक्ट सध्या कोणत्याही स्थितीत बनत नाही आहे. आता तरी यावर कोणाचेही लक्ष नाही, असे स्पष्ट करत त्याने चाहत्यांच्या आशेला तात्पुरता ब्रेक दिला. संजू बाबासोबतच्या नव्या चित्रपटाबद्दल सलमानने फारसा तपशील दिला नाही, पण हा चित्रपट एकदम देहाती आणि नेक्स्ट लेव्हल असणार आहे, असे त्याने सांगितले.

सलमान आणि आमिर खान अंदाज अपना अपना 2 साठी एकत्र येणार का, या प्रश्नावर तो म्हणाला, हो, आम्ही दोघेही खूप उत्साहित आहोत. राजकुमार संतोषी यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. ते काहीतरी भन्नाटच करणार. बजरंगी भाईजानच्या सिक्वेलबद्दल विचारले असता सलमान म्हणाला, हो, हे होऊ शकते. कबीर खान यावर काम करत आहे. मात्र, त्याने कोणतीही ठोस माहिती दिली नाही.

वाघ्याची अडचण आहे की, होळकरांनी निधी दिलाय याची? भूषणसिंह राजे होळकरांचा रोख कोणाकडे?

सलमानने सूरज बडजात्या यांच्या आगामी चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असल्याचे जाहीर केले. त्याने चित्रपटाचे नाव सांगितले नसले तरी लवकरच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल, असे सांगितले. सलमानच्या या घोषणांमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. आता पाहायचं, त्याचा पुढचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाका निर्माण करतो का…

 

follow us