Download App

VIDEO: अनिल कपूरनं सांगितली ‘अ‍ॅनिमल’ मधील बलबीर सिंगची खास गोष्ट!

Animal Anil Kapoor Balbir Singh Look: संदीप रेड्डी वंगा (Sandeep Reddy Vanga) दिग्दर्शित ‘अॅनिमल’ (Animal Movie) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर (box office) धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाचा आशय, अॅक्शन आणि कलाकारांच्या कामाचे खूप कौतुक होत आहे. रणबीर कपूरशिवाय (Ranbir Kapoor) या चित्रपटातील अनिल कपूरच्या (Anil Kapoor) व्यक्तिरेखेचीही जोरदार चर्चा होत आहे. अनिल कपूरच्या बलबीर सिंगची भूमिका सुपरहिट तर ठरली पण या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली आहे, याच मागची खास गोष्ट त्यांनी त्यांचा सोशल मीडिया व्हिडिओ मधून दाखवली आहे.


चित्रपटातील पडद्यामागील ही गंमत आणि अनिल यांची अपार मेहनत या व्हिडिओ मधून बघायला मिळत आहे. अनिल कपूर यांना या भूमिकेसाठी खूप कष्ट करावे लागले असून त्यांनी व्हिडिओमध्ये संपूर्ण चेहऱ्याचा मुखवटा कसा घातला याची गोष्ट उघड केली आहे. 40 वर्षांपासून विविध चित्रपटांमध्ये अनिल कपूर यांच्या वेगवेगळ्या भूमिका साकारल्या हा मेगास्टार आता त्याच्या शिस्तबद्ध आणि त्याने निवडलेल्या प्रत्येक पात्रासाठी खूप मेहनत घेत असतात. यावेळीही दुहेरी भूमिकेच्या तयारीचा भाग म्हणून त्याने प्रोस्थेटिक्सचाचा वापर केला.

सध्या या सिनेमाच्या अॅक्शन थ्रिलरने भारतात 443.27 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. लवकरच तो 500 कोटींचा टप्पा पार करेल. अॅनिमलने जगभरात 700 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. या चित्रपटाने जागतिक स्तरावर 737.98 कोटींचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाबाबत बोलले जात आहे की, 12व्या दिवशी हा चित्रपट 450 कोटींचा आकडा पार करू शकतो. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवरील एकूण कमाईपैकी, चित्रपटाने केवळ हिंदी आवृत्तीतून 400.37 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘रणबीरच्या अ‍ॅनिमल चित्रपटाने मोडला ‘बाहुबली 2’चा रेकॉर्ड, आतापर्यंत कमावले इतके कोटी

‘अ‍ॅनिमल’चे दिग्दर्शन संदीप वंगा रेड्डी यांनी केले आहे. यामध्ये रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसत आहे. चित्रपटात बॉबी देओलची भूमिकाही महत्त्वाची आहे. अनिल कपूर रणबीर कपूरच्या वडिलांच्या भूमिकेत आहे आणि रश्मिका मंदान्ना रणबीरच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. त्यांच्याशिवाय शक्ती कपूर, सुरेश ओबेरॉय, तृप्ती डिमरी, प्रेम चोप्रा या कलाकारांची भूमिका बघायला मिळत आहे.

Tags

follow us