‘रणबीरच्या अ‍ॅनिमल चित्रपटाने मोडला ‘बाहुबली 2’चा रेकॉर्ड, आतापर्यंत कमावले इतके कोटी

‘रणबीरच्या अ‍ॅनिमल चित्रपटाने मोडला ‘बाहुबली 2’चा रेकॉर्ड, आतापर्यंत कमावले इतके कोटी

Animal Box Office Collection Day 12: संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) ‘अॅनिमल’ (Animal) हा सिनेमा सध्या जोरदार चर्चेत आहे. दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाचा वेग थांबत नाही. (Box Office) मंगळवारी अ‍ॅनिमलने 13 कोटींचा गल्ला कमावला आहे, त्यानंतर भारतात त्याची एकूण कमाईचा आकडा 458.12 कोटी रुपये झाला आहे. जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या अॅक्शन थ्रिलरने 737 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by T-Series (@tseries.official)


रिपोर्ट्सनुसार, रणबीर कपूरच्या चित्रपटाने शाहरुख खान आणि सनी देओलच्या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत. ‘अॅनिमल’ने 12 दिवसांत 450 कोटींचा टप्पा ओलांडला आहे, तर शाहरुख खानच्या ‘पठाण’ला हा आकडा पार करायला 18 दिवस लागले होते. सनी देओलच्या ‘गदर 2’ने 17 दिवसांत हा आकडा पार केला होता.

अॅनिमलने प्रभास स्टारर ‘बाहुबली 2’लाही बॉक्स ऑफिसवर मागे टाकले आहे. एसएस राजामौली दिग्दर्शित या चित्रपटाने 450 कोटींचा आकडा पार करण्यासाठी 20 दिवस घेतले होते. रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ने ‘पठाण’, ‘गदर 2’ आणि ‘बाहुबली’चे रेकॉर्ड मोडले असतील, मात्र ‘जवान’ला मागे टाकण्यात तो अपयशी ठरला. शाहरुख खानच्या वर्षातील दुसऱ्या ब्लॉकबस्टरने 11 दिवसांत 450 कोटी रुपयांची कमाई केली होती.

Panchak Trailer: अखेर प्रतीक्षा संपली! धक धक गर्लच्या ‘पंचक’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

‘Animal’ ने पहिल्याच दिवशी 63.8 कोटींचा व्यवसाय केला. जे ओपनिंग डे साठी खूप जास्त आहे. हा चित्रपट रणबीर कपूरच्या करिअरमधील सर्वात मोठा हिट चित्रपट ठरत आहे. बॉबी देओलचेही या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळत आहे. चित्रपटाचे दुसऱ्या दिवशीचे कलेक्शन 66.27 कोटी होते. जे पहिल्या दिवसापेक्षा किंचित जास्त आहे. तिसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत लक्षणीय वाढ झाली आहे. चित्रपटाने 7.83 टक्के वाढीसह 71.46 कोटींचा व्यवसाय केला. चौथ्या दिवशी, चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये 38.48 टक्के घट झाली आणि एकूण कलेक्शन 43.96 कोटी रुपये झाले. यानंतर चित्रपटाचे कलेक्शन दिवसेंदिवस कमी होत असले तरी सर्व रेकॉर्ड मोडण्यात चित्रपट यशस्वी ठरला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube