Sayaji Shinde Health Update : मराठी-हिंदी आणि दाक्षिणात्य अशा सर्वच भाषिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडलेले अभिनेते म्हणजे सयाजी शिंदे (Sayaji Shinde ) होय. सयाजी शिंदेंचा मोठा चाहतावर्ग आहे. या अभिनेत्याने विविध सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. पडद्यावर खतरनाक खलनायक म्हणून प्रसिद्ध असणारे सयाजी खऱ्या आयुष्यात मात्र रिअल हिरो (Real Hero) आहेत.
सयाजी शिंदे राज्यात ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी ओळखले जातात. (Social media) अभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्ष मित्र आणि नागरिकांच्या पुढाकारातून ठिकठिकाणी काम सुरु आहे. सध्या अभिनेत्याच्या छातीत त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. साताऱ्यात त्यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया पार पडली आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सयाजी शिंदे यांच्या प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी त्यांचे अनेक चाहते प्रार्थना करत असल्याचे दिसत आहेत.
डॉक्टर काय म्हणाले…
अभिनेत्यावर साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. सोमनाथ साबळे त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. म्हणाले की, “सयाजींना गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीविषयी असवस्थता जाणवत होती. त्यामुळे त्यांनी रुटीन म्हणून काही चाचण्या करुन घेतल्या होत्या. आणि त्यामध्ये काहीसे मायनर बदल सापडले. त्यांच्या हृदयाच्या एका लहानश्या भागाची हालचाल थोडी कमी असल्याचं जाणवलं होतं. परंतु आता त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती दिली.
अक्षय आणि टायगरच्या ‘BMCM’वर पैशांचा पाऊस, वीकेंडला बॉक्स ऑफिसवर होणार धमाका
सयाजी शिंदे मराठी-हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. मराठी-हिंदीसह कन्नड, तामिळ, मल्याळम आणि तेलुगू चित्रपटांतही त्यांनी काम केलं आहे. अभिनयासह त्यांनी सिने-निर्मितीही केली आहे. सयाजी शिंदे अभिनेते असण्यासोबत वृक्षप्रेमीदेखील आहेत. ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ या गाजलेल्या चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली आहे. आता त्यांच्या आगामी कलाकृतींची चाहत्यांना उत्सुकता आहे.
सयाजी शिंदेनी झाडे लावण्याचा आणि वृक्षतोड रोखण्याचा विडा उचलला आहे. ते सतत झाडे लावा, झाडे जगवा अशा उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करत असतात. त्यांच्या या उपक्रमाला ठिकठिकाणचे नागरिक चांगला प्रतिसाद देतात.