Download App

Shah Rukh Khan birthday: किंग खानचा 58 वा वाढदिवस, मन्नतबाहेर चाहत्यांची गर्दी

Shah Rukh Khan birthday: बॉलिवूडचा बादशाह किंग खान (King Khan) म्हणजेच चाहत्यांचा लाडका शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) आज वाढदिवस आहे. किंग खान आज आपला 58 वा वाढदिवस (Shah Rukh Khan Birthday) साजरा करत आहे. किंग खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी मध्यरात्रीच त्याच्या मन्नत (Mannat) बंगल्याबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. किंग खानने या सर्व चाहत्यांचे मन्नतबाहेर येऊन आभार मानले आहे. चाहत्यांनी जास्त गर्दी केल्याने पोलिसांना नियंत्रण मिळवण्यासाठी लाठी चार्ज करण्यात आला आहे.


किंग खान म्हणजेच शाहरुख खान हा फक्त बॉलिवूड अभिनेता नसून जगभरात त्याचा मोठा बोलबाला आहे. जगभरात त्याचा मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग आहे. किंग खानची एक झलक बघण्यासाठी आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नेहमीप्रमाणे यंदा देखील चाहत्यांनी मन्नतबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मन्नत बंगल्याच्या गॅलरीमधले किंग खानचे आणि बंगल्याबाहेरील चाहत्यांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहेत. किंग खानने सर्व चाहत्यांना आभार मानले आहे. तसेच त्याच्या आयकॉनिक पोझने तर चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.

किंग खानला सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. त्यामुळे त्याने ट्वीट करत या सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याने ट्वीट केलं आहे की, “तुमच्यापैकी अनेक लोक दरवर्षी रात्री उशिरा येऊन मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात हे अविश्वसनीय आहे. मी फक्त एक अभिनेता आहे. तुमचं मनोरंजन करत असताना मला खूप आनंद मिळतो. खरंतर तुमच्या या प्रेमाच्या स्वप्नात मी जगतो. मला तुमचं मनोरंजन करण्याची परवानगी दिली त्याबद्दल मनापासून आभार. सकाळी भेटू ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन”. शाहरुखच्या या ट्वीटनंतर आता त्याच्या आगामी ‘डंकी’ (Dunky) या सिनेमाचा टीझर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leo Box office Collection: विजयच्या ‘लिओ’ची 600 कोटींच्या दिशेने कूच, आतापर्यत जमवला इतक्या कोटींचा गल्ला?

किंग खानसाठी यंदाचा वाढदिवस खूपच खास आहे. त्याचे ‘जवान’ (Jawan) आणि ‘पठाण’ (Pathaan) हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जवान आणि पठाणच्या यशाचं सेलिब्रेशन किंग खान आज करणार आहे. किंग खानच्या ग्रँड बर्थडे पार्टीत करण जोहर, आलिया भट्ट, दीपिका पादुकोण, राजकुमार हिरानी, एटली हे सेलिब्रिटी हजर राहणार आहे. तसेच भाईजान (Salman Khan) देखील या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे.

Tags

follow us