Leo Box office Collection: विजयच्या ‘लिओ’ची 600 कोटींच्या दिशेने कूच, आतापर्यत जमवला इतक्या कोटींचा गल्ला?

  • Written By: Published:
Leo Box office Collection: विजयच्या ‘लिओ’ची 600 कोटींच्या दिशेने कूच, आतापर्यत जमवला इतक्या कोटींचा गल्ला?

Leo Box office Collection: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील सुपरस्टार अभिनेता म्हणून थलपती विजय (Thalapathy Vijay) ओळखला जातो. अनेक चित्रपटातून विजयने दमदार भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. गेल्या वर्षी विजयचा वारिसु हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर विजयचा बहुचर्चित लिओ चित्रपट (Leo Film) नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. 31 ऑक्टोबरला लिओ चित्रपटाने 540 कोटी रुपयांची कमाई केली. ही कमाई अवघ्या बारा दिवसांची आहे.

Uddhav Thackeray : ‘मोदी इस्त्रायल युद्धावर चिंता व्यक्त करतात पण’.. ठाकरे गटाचा हल्लाबोल 

थलापती विजय अभिनित आणि लोकेश कनागराज दिग्दर्शित लिओ सिनेमा 19 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट पार्थीबन नामक हिमाचलमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीच्या आयुष्यावर आधारीत आहे. पत्नी, दोन मुलं आणि एक कॅफे असं आरामदायी आयुष्य जगणाऱ्या पार्थीबनची गोष्ट या चित्रपटात आहे. या चित्रपटात विजय थपापती प्रमुख भूमिका साकारली आहे. हा सिनेमा चित्रपटगृहात आल्यापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विक्रम मोडीत काढत आहे.

या चित्रपटाने केवळ 12 दिवसांत जगभरात 540 कोटींची कमाई केली आहे. मंगळवार, 31 ऑक्टोबर रोजी या अॅक्शन थ्रिलरने भारतात सुमारे 4.10 कोटी रुपयांची कमाई केल्याचा अंदाज आहे. हा चित्रपट आणखी कमाई करेल, अशी शक्यता वर्तवली जाते. या चित्रपटाचे भारतात 13 दिवसांचे एकूण कलेक्शन 312 कोटी रुपये झाले आहे.

सेव्हन स्क्रीन स्टुडिओ निर्मित, लिओला अनिरुद्ध रविचंदरने संगीत दिले होते. सिनेमॅटोग्राफी मनोज परमहंस यांनी केली. तर या चित्रपटाची कथा पटकथा लोकेश, रत्ना कुमार आणि दीरज वैद्य यांनी लिहिलं. या चित्रपटात विजय, त्रिशा, संजय दत्त, अर्जुन सर्जा, मायस्किन, गौतम मेनन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटात संजयत व्हिलनच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून या चित्रपट पुढच्या काही दिवसांत 600 कोटींचा पल्ला गाठण्याची शक्यता आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube