Download App

… अन् ‘ती’ घरी आली! हातात ट्रॉफी, देवाचे आभार आणि अमृताची पोस्ट चर्चेत!

Amruta Khanvilkar परदेशात असताना तिला 60 आणि 61 वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला आता अमृताच्या घरी " ती " च खास आगमन झालं.

‘she’ came home! Thank God with a trophy in hand and this post of Amruta Khanvilkar trending : परदेशात असताना अमृताला उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून यंदाचा 60 आणि 61 वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला पण ती परदेशात असल्याने हा पुरस्कार दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी स्वीकारला होता आणि आता अमृताच्या घरी ” ती ” च खास आगमन झालं आणि हीच गोड बातमी तिने सोशल मीडिया वर फोटो पोस्ट करून दिली आहे.

काही लोकं बेन्टेक्सचं त्यांचं काय करायचं? हे भाजपच्या खऱ्या सोन्याने पहावं; रोहित पवारांचा पडळकरांवर निशाणा

अमृताने आजवर अनेक हिंदी मराठी चित्रपट स्वतःच्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली एवढं नाही तिच्या नृत्य कौशल्यांचा चर्चा देखील तितक्याच आहेत आणि यंदाचा 60 आणि 61 वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तिला चंद्रमुखी साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. चंद्रमुखी हा चित्रपट अमृतासाठी कायम खास राहिला आहे आणि तिचा हा पहिला वहिला राज्य चित्रपट पुरस्कार असल्याने तो अजून खास झाला आहे.

ब्लूमबर्गच्या यादीत स्थान मिळवल्यानंतर हिमेशने ‘साज’ हा नवा ट्रॅक रिलीज

अमृता हल्ली अनेक प्रोजेक्ट्स साठी परदेश दौरा करत आहे आणि तिने भारतात परत आल्यावर आज हा खास क्षण सगळ्यांसोबत शेयर केला आहे. आईच्या हातात असलेला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार आणि अमृता असे खास फोटो तिने सोशल मीडिया वर पोस्ट केले आहेत आणि एक भावनिक पोस्ट देखील लिहिली आहे.

या पात्राने अभिनेता आणि कलाकार म्हणून माझ्यात उर्जा निर्माण केली, ‘वॉर 2’ ला जगभरात यश

अमृता ने हातात ही खास ट्रॉफी पकडलेला फोटो पोस्ट करून लिहिलं ” एकदाचा हातात पुरस्कार आला खूप आनंद होतोय. खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र राज्य शासन या खास शाबासकी बद्दल ! चंद्रमुखी च्या संपूर्ण कास्ट आणि टीम चे विशेष आभार मला ही संधी दिल्या बद्दल मी कायम ऋणी राहीन. इतकचं नाही संपूर्ण प्रवासात माझ्या सोबत असलेल्या प्रत्येकाचे खूप आभार आणि स्वामी शिवाय हे शक्य नव्हतं श्री स्वामी समर्थ!

नादाला लागू नका, आपण भावकीमुळे आमदार; अजितदादांचा रोहित पवारांना टोला

आयुष्यात पहिल्यांदा घडलेल्या गोष्टी कौतुक काही औरच असत असं म्हणतात ना म्हणून हा पहिला वहिला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार अमृतासाठी खूप जास्त खास झाला आहे. अमृता लवकरच काही वेगळ्या आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारणार असल्याचं देखील कळतंय.

follow us