या पात्राने अभिनेता आणि कलाकार म्हणून माझ्यात उर्जा निर्माण केली, ‘वॉर 2’ ला जगभरात यश

या पात्राने अभिनेता आणि कलाकार म्हणून माझ्यात उर्जा निर्माण केली, ‘वॉर 2’ ला जगभरात यश

Bollywood actor Hrithik Roshan : बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनचे (Bollywood) जगभरात प्रचंड चाहते आहेत. त्याच्या चित्रपटांचा चित्रपटगृहांमध्ये चांगला रेकॉर्ड आहे. हृतिक रोशन वेळोवेळी त्याच्या चित्रपटांच्या उत्तम बॉक्स ऑफिस कलेक्शनने चाहत्यांना आश्चर्यचकित करत राहतो. तो पुन्हा एकदा तेच करताना दिसतो. हृतिक या यशाबद्दल आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.

हृतिक रोशन ‘वॉर २’ घेऊन आला आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाची सुरुवात चांगली झाली होती, त्यानंतर दुसऱ्या दिवशी चित्रपटाची कमाई आणखी प्रभावी दिसली आहे. दुसऱ्या दिवशी ‘वॉर २’च्या कमाईत वाढ झाली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीचा फायदा चित्रपटाला मिळाला आहे. अशा परिस्थितीत, आता चित्रपटाला पहिल्या आठवड्यात चांगली आघाडी घेण्याची संधी मिळाली आहे. ‘वॉर २’च्या कमाईचे ताजे आकडे आले आहेत. या चित्रपटाने रिलीजच्या २ दिवसांत मोठी कमाई केली आहे.

..त्या काळात मी मंदिरात जाण्याचा आग्रह धरला; मासिक पाळीबद्दल अभिनेत्री अन् खासदार कंगना काय म्हणाली?

वॉर २ च्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी ५१.५ कोटी रुपये कमावले. हिंदी आणि तेलुगूमध्येही हा चित्रपट खूप पसंत करण्यात आला. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली. वॉर २ ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी ५६.५० कोटी रुपये कमावले आहेत. १५ ऑगस्ट रोजी चित्रपटाला चांगला फायदा झाला. आता, सॅकनिल्कच्या वृत्तानुसार, वॉर २ ची २ दिवसांतली कमाई १०८ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिश्रित व्ह्यूज मिळत आहेत. पण तरीही, २ दिवसांत १०८ कोटींची कमाई चित्रपटासाठी महत्त्वाची आहे.

कबीरच्या जगात, लढाया जिंकता येतात.. पण युद्ध चालूच राहते.

२०१९ मध्ये जिवंत झालेल्या या पात्राने अभिनेता आणि कलाकार म्हणून माझ्यात उर्जा निर्माण केली आहे. सिनेमागृहांमध्ये तुमचं सर्व जयजयकार आणि उत्सव पाहिल्याने कबीर मोठा दिसतो. आणि माझे हृदय आणि मन भरून येते. कबीर माझ्या पडद्यावरील सर्वात प्रिय पात्रांपैकी एक होता आणि नेहमीच राहील अशा शब्दांत अभिनेता हृतिक रोशन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या