Download App

Shekhar Kapoor यांचा ड्रीम प्रोजेक्ट ‘पानी’ लवकरच पुर्ण होणार? रिसर्च सेंटरमधील फोटो व्हायरल

Shekhar Kapoor बाफ्टा आणि गोल्डन ग्लोब कामगिरीसाठी ओळखले जाणारे शेखर कपूर यांनी जलसंवर्धनातील नाविन्यपूर्ण उपायांसाठी उत्सुकता व्यक्त केली.

Shekhar Kapoor Dream Project complete soon photo viral : पुरस्कार विजेते चित्रपट निर्माता शेखर कपूर ( Shekhar Kapoor) यांनी नुकतीच NYU अबू धाबी वॉटर रिसर्च सेंटरला ( Research Center) भेट दिली. त्याच्या बाफ्टा आणि गोल्डन ग्लोब कामगिरीसाठी ओळखले जाणारे शेखर कपूर यांनी जलसंवर्धनातील नाविन्यपूर्ण उपायांसाठी उत्सुकता व्यक्त केली. रिसर्च सेंटरमधील शेखर कपूर यांचे काही फोटो सोशल मीडिया वर व्हायरल झाले असून चाहत्यांना अंदाज लावला आहे की हे लेखक त्याच्या ड्रीम प्रोजेक्ट ‘पानी’ वर काम करण्यास उत्सुक आहे.

रोमँटिक, ॲक्शन थ्रिलर्स ते हॉरर, प्रेक्षकांच्या मनात घर करणारी राशी; पाहा फोटो

यापूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शकाने त्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल खुलासा केला होता. “अध्यात्मिक कथा” असलेली “नाटकीय स्क्रिप्ट” असे संबोधून कपूर म्हणाले की ‘पानी’ ची कथा “प्रेमाच्या कथेसह अनेक नातेसंबंधांबद्दल” आहे. चित्रपटाच्या कथेसाठी पाणी हे कसे “किल्ली” आहे हे त्याने जोडले. विशेष म्हणजे या चित्रपटात सुशांत सिंग राजपूतची भूमिका असणार होती. तथापि अजून पर्यंत या प्रोजेक्ट वर काही माहिती समोर आली नाही.

बच्छावांसाठी ‘धुळ्याची’ वाट अवघडच… सुभाष भामरे तिसऱ्यांदा खासदार होणार?

दरम्यान शेखर कपूर त्याच्या 1983 मध्ये आलेल्या ‘मासूम’ चित्रपटाच्या सिक्वेलसाठी तयारी करत आहेत.ज्याचे नाव आहे ‘मासूम…द नेक्स्ट जनरेशन’ आहे. आजच्या समाजातील ‘घर’ या संकल्पनेचा शोध घेणारा हा चित्रपट कपूरची मुलगी कावेरी कपूरच्या अभिनयात पदार्पण करत आहे. तो लवकरच रिलीज होणार आहे.

follow us

वेब स्टोरीज