Manvat Murders: ‘मी सेट वर…’; अभिनेत्रीने शेअर केले ‘मानवत मर्डर्स’च्या सेटवरील Unseen Photos

Manvat Murders: ‘मी सेट वर…’; अभिनेत्रीने शेअर केले ‘मानवत मर्डर्स’च्या सेटवरील Unseen Photos

Sai Tamhankar Manvat Murders Photos: अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar)ला कोणत्याच परिचयाची गरज नाही. तिने मराठीसह हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात अनोखं स्थान निर्माण केले आहे. सई नेहमीच हटके भूमिका साकारताना दिसते. आता ती लवकरच एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती लवकरच सोनी लिव्हवर ‘मानवत मर्डर्स’ (Manvat Murders) सीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजमध्ये ती समिंद्रीची भूमिका साकारताना दिसणार आहे. सईचा यातील नॉन ग्लॅमरस लूक सध्या जोरदार चर्चेत आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)


अभिनेत्री सई ताम्हणकर हिने नुकतेच ‘मानवत मर्डर्स’ या (Manvat Murders Series) सीरिजमधील तिचे फोटो शेअर केले आहेत. (Unseen Photos) तिने फोटो शेअर करत लिहिले की, मी सेट वर खळखळून हसताना. यात सई फिकट पिंक रंगाची नववारी साडी नेसली आहे. तिच्या हातात स्क्रिप्ट आहे. तिचा हा लूक चाहत्यांना खूप भावतो आहे. तिचा हा लूक पाहून ते सीरिज पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

1970च्या दशकामध्ये महाराष्ट्राला हादरवणाऱ्या कुप्रसिद्ध शोकांतिकाचा मागोवा या मालिकेमधून घेतला जाणार आहे. या मालिकेमध्ये भारताचे शेरलॉक होल्म्स म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध सीआयडी अधिकारी रमाकांत एस कुलकर्णी यांची आपल्या कामाप्रती अविचल बांधिलकी, चिकाटी आणि गुंतागूंतीची प्रकरणे सोडविण्याचे त्यांचे कौशल्य यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

Sai Tamhankar : सई ताम्हणकरचा स्टनिंग लूक, चाहत्यांना लावलं वेड

फूटप्रिंट्स ऑन द सँड ऑफ क्राइम रमाकांत कुलकर्णी यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकावर आधारित या मालिकेमध्ये आशुतोष गोवारीकर, मकरंद अनासपुरे, सोनाली कुलकर्णी आणि सई ताम्हणकर यांच्यासह अनेक लोकप्रिय कलाकार प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहेत. ‘मानवत मर्डर्स’ 4 ऑक्टोबरपासून भेटीला येणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube