Shivrayancha Chhava : दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ (Shivrayancha Chhava) चित्रपटातील भव्यदिव्य गीत ‘सिंहासनी बैसले शंभू राजे’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. दिग्पाल लांजेकार यांच्या ‘शिवराज अष्टक’ने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ‘शिवराज अष्टक’मधील पाचही मराठी सिनेमाना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. (Marathi Movie) सिनेमांमध्ये आता चाहत्यांच्या भेटीला सहावे पुष्प अर्थात ‘शिवरायांचा छावा (Shivrayancha Chava ) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अजितदादांचा आता विदर्भावर डोळा? नागपूर-अमरावतीसाठी घेतला ‘स्पेशल’ निर्णय
या गाण्याबद्दल सांगायचं झालं तर गाणं हे अत्यंत भव्यदिव्य आहे. ज्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा दाखवण्यात आला आहे. त्यामुळेच गाण्याचे बोलचं ‘सिंहासनी बैसले शंभू राजे’ असे आहेत. तसेच हे गाणं स्वतः दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी लिहिले आहे. तर देवदत्त मनिषा बाजी यांनी या गाण्याला संगीत दिले असून हिंदीतील प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी हे गाणं गायलं आहे. सोशल मिडीयावर दोन तासांतच या गाण्याला प्रचंड व्ह्युज मिळाले आहेत.
‘दरोड्याची पोलखोल करणार’; ठाकरेंच्या पत्रकार परिषदेआधी राऊतांचा नार्वेकर-शिंदेंवर हल्लाबोल
तसेच छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘शिवरायांचा छावा’ हा मराठी आगामी चित्रपट 16 फेब्रुवारी 2024 पासून फक्त चित्रपटगृहात भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसाखाली या सिनेमाची पहिली झलक सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आली होती. दिग्दर्शकांनी सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करत सिनेमाचा प्रोमो शेअर केला होता.
या सिनेमाने जागतिक स्तरावर रिलीजच्या अगोदरच एक अनोखा रेकॉर्ड केला आहे. न्यूयॉर्क येथील टाईम्स स्क्वेअरवर या मराठी सिनेमाचे पोस्टर झळकले आहे. हा विक्रम करणारा ‘शिवरायांचा छावा’ हा पहिला मराठी सुपरहिट सिनेमा ठरला जाणार आहे. ‘शिवरायांचा छावा’चे निर्माते मल्हार पिक्चर कंपनीने सोशल मीडियावरुन ही गोष्ट शेअर केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमचा टीझर टाईम्स स्क्वेअरवर झळकला आहे…”
‘शिवरायांचा छावा’ या सिनेमात मुख्य भूमिकेत, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, विक्रम गायकवाड, अमित देशमुख, भूषण विनतरे यांच्यासह अनेक सेलिब्रिटी बघायला मिळणार आहेत. सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांचा न उलगडलेला इतिहास आपल्याला सिनेमात बघायला मिळणार आहे. सिनेमा आगामी वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रदर्शित होणार असल्याची सध्या चर्चा सुरु आहे.