‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ ची टीम श्री सिद्धिविनायक चरणी नतमस्तक! पाहा खास फोटो

- ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा चित्रपट उद्या सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाला यश मिळावे यासाठी चित्रपटाच्या टीमने श्री सिद्धिविनायक चरणी दर्शन घेऊन बाप्पाचे आशीर्वाद घेतले.
- संत निवृत्ती महाराज, संत सोपान, संत ज्ञानेश्वर आणि संत मुक्ताई या भावंडांचे नाते अतिशय आदर्शवत, सुंदर असेच होते.
- या भावंडांच्या संतपणाची महती सांगत, संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या कुटुंबाची चरित्रगाथा ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमांतून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचणार आहे.
- दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित हा भव्य चित्रपट १८ एप्रिलला प्रदर्शित होत आहे.
- रेश्मा कुंदन थडानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून चित्रपटाची प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे.