Download App

Sonu Sood च्या चाहत्यांचं अनोखं गिफ्ट; ‘मैं भी सोनू सूद’ मोहिमेनी गाठली मुंबई

  • Written By: Last Updated:

Sonu Sood : कोरोना काळात गरिबांसाठी देवासारखा धावून आलेला सोनू सूद (Soonu Sood) अद्याप मदत कार्यात गुंतला आहे. नुकतचं त्याने चेन्नईमध्ये महापूर आल्यानंतर तेथील पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात दिला होता. अशा प्रकारचे सामाजिक काम करण्यासाठी सोनूची एक संस्था काम करते. तसेच त्याच्या कामाची प्रेरणा घेत त्याच्या चाहत्यांनी ‘मैं भी सोनू सूद’ ही मोहिम सुरू केली होती. त्यामध्ये दिल्ली पासून मुंबईपर्यंत सामाजिक काम करण्यात आलं आहे.

प्रसिद्धी मिळाल्यानं जरांगेंच्या डोक्यात हवा, भुजबळांना मारण्याची धमकी; समीर भुजबळांचा गंभीर आरोप

या मोहिमेची मुंबईमध्ये सांगता करण्यात आली. त्यावेळी स्वतः सोनू सूद देखील या मोहिमेच्या सांगतेला उपस्थित होता. त्याच्या समर्थकांनी 4 नोव्हेंबर 2023 ला नवी दिल्लीहून ही देश व्यापी मोहिम सुरू केली होती. शेवटी मुंबई पर्यंत ही मोहीम येऊन पोहोचली आहे. सामाजिक बांधिलकी जपत एकता आणि गरिबांना मदत करण्यासाठी संपूर्ण भारतातील लोकांना एकत्र जोडणे हा या अभिनव उपक्रमाचा उद्देश आहे.

मालवाहू जहाजाच्या अपहरणाचा डाव उधळला; भारतीय नौदलाची जिगरबाज कामगिरी

ही मोहीम उत्तरेकडील गाझियाबाद, डेहराडून, शिमला, अमृतसर, मोगा यासारख्या मोठ्या शहरातून त्याच्या सोबतीने लहान शहरे आणि महानगरांसह 100 हून अधिक शहरे पार करून पश्चिमेकडे जैसलमेर, बामेर आणि अहमदाबाद यांसारख्या शहरांमध्ये पुढे गेली आणि आता मुंबईत तिचा शेवट झाला आहे. सोनू सूदला त्याच्या चाहत्यांकडून हे खास गिफ्ट आहे असं म्हणायला हरकत नाही.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाला डबल झटका; शमी, चहर आऊट

हा प्रवास इंदूर आणि भोपाळ यांसारख्या मध्यवर्ती शहरांमधून, पूर्वेकडील, बरेली, बिसापूर, पौनी आणि नागपूर सारख्या शहरांमध्ये चालू राहिला आणि मुंबईला पोहोचण्यापूर्वी कल्लेश्वरम, तिरुपती आणि विजयवाडा देखील त्यांनी कव्हर केला. मंगळुरू वाटेत पश्चिमेला बेंगळुरू आणि पणजी सुमारे 40 दिवसांत 27 प्रमुख थांब्यांसह आणि 154 तासांत 6645 किलोमीटर अंतर कापून संपवून दुब्बा थांडा येथील सोनू सूद मंदिरात रात्रभर थांबून हा प्रवास सुरू होता.

सोनू हा अभिनयाच्या पलिकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपणारा अभिनेता आहे. शिक्षण आणि वैद्यकीय गरजांमध्ये योगदान देऊन समाजातील सर्वात असुरक्षित व्यक्तींना मदतीचा हात पुढे करून ही मोहीम उत्तम काम करत आहे. “मैं भी सोनू सूद” ही केवळ एक मोहीम नव्हती तर ती मानवी जीवनात बदल घडवून आणून सगळ्यांना एकत्रित घेऊन येऊन काम करण्याची अनोखी ताकद होती.

Tags

follow us