Sonu Sood Post: अभिनेता आणि समाजसेवक सोनू सूदने (Sonu Sood ) त्याच्या सोशल मीडिया (social media) हँडलवर एक खास पोस्ट केली आहे. ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मुलांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी त्याने शाळा बांधण्यासाठी योगदान देण्याच आवाहन करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. शाळांच्या विकासात सूद यांचे योगदान तेलंगणा, महाराष्ट्र (Maharashtra) आणि पंजाबसह (Punjab) देशातील विविध भागात पसरले आहे.
विद्यार्थ्यांसाठी ही अनोखी मोहीम आहे. त्यांच्या शिक्षणासाठी अभिनेत्याने एक अनोखं पाऊल उचललं आहे. व्हिडिओ शेअर करताना सोनू सूदने लिहिले की, “आपला देश आणखी मजबूत करण्यासाठी गरीबांसाठी शाळा बांधा. ज्या मुलांना अभ्यास करता येत नाही त्यांना दत्तक घ्या. ज्या शाळांना तुमची गरज आहे त्यांना सपोर्ट करा. #supporteducation #school #education”
माननीय 37 व्या सरन्यायाधीश न्यायमूर्ती के जी बालकृष्णन आणि माननीय न्यायमूर्ती ज्ञानसुधा मिश्रा यांच्या हस्ते या परोपकारी व्यक्तीला अलीकडेच चॅम्पियन्स ऑफ चेंज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
‘आये मेरे वतन के लोगों’… गाण्याने वेड लावणारे प्रसिद्ध गायक पंकज उधास यांचं निधन
वर्क फ्रंटवर सोनू सूदने त्याच्या ‘फतेह’ चित्रपटासाठी वाट बघत असून गो पहिल्यांदाच दिग्दर्शक म्हणून भूमिका साकारताना दिसणार आहे. जॅकलीन फर्नांडिससोबत सोनू यात दिसणार असून फतेह’ची निर्मिती सोनू सूदची निर्मिती कंपनी शक्ती सागर प्रॉडक्शनने केली आहे आणि झी स्टुडिओजची सहनिर्मिती आहे.