Spider-Man: शुभमन गिलचा स्पाडरमॅन ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Shubman Gill : टीम इंडियाचा हँडसम हंक शुभमन गिल (Shubman Gill) सध्या जोरदार चर्चेत आहे. तर आता शुभमन लवकरच एका वेगळ्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. शुभमन गिल आता फिल्मी जगताशी जोडला जाणार असून त्याचं कनेक्शन आता थेट हॉलिवूडशी ( Hollywood ) जोडलं गेले आहे. शुभमन गिलच्या स्पायडरमॅन अवतार चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. आता शुभमन गिलच्या रूपाने […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 18T103658.652

Spider-Man

Shubman Gill : टीम इंडियाचा हँडसम हंक शुभमन गिल (Shubman Gill) सध्या जोरदार चर्चेत आहे. तर आता शुभमन लवकरच एका वेगळ्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. शुभमन गिल आता फिल्मी जगताशी जोडला जाणार असून त्याचं कनेक्शन आता थेट हॉलिवूडशी ( Hollywood ) जोडलं गेले आहे. शुभमन गिलच्या स्पायडरमॅन अवतार चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. आता शुभमन गिलच्या रूपाने स्पायडर मॅन ( Spider – Man ) तुमच्या घरी येणार आहे. हे नेमकं काय प्रकरण आहे.


शुभमन गिल ‘स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर वर्स’ ( Spider – Man : Across the Spider – Verse ) मध्ये इंडियन स्पायडर मॅनसाठी आपला आवाज दिला आहे. अर्थात डबिंग केला आहे. या चित्रपटात इंडियन स्पायडर मॅनची भूमिका पवित्र प्रभाकर साकारणार आहे. चाहत्यांना या सिनेमाची मोठी उत्सुकता लागली आहे. तर दुसरीकडे आता क्रिकेटप्रेमी देखील या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहतायत.

शुभमन गिल ( Shubman Gill ) पंजाबी आणि हिंदी सिनेमासाठी स्वतःचा आवाज देणार आहे. सोनी पिक्चर्स इंटरटेनमेंट इंडिया द्वारे हा सिनेमा संपूर्ण भारतात रिलीज होणार आहे. यावेळी टीम इंडियाचा खेळाडू शुभमन गिल ( Shubman Gill ) म्हणाला की, स्पायडर मॅन हा सर्वात विश्वासू सुपरहिरो पैकी एक मानला जातो.

या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच भारतीय स्पायडर-मॅन पडद्यावर दिसणार आहे. भारतीय स्पायडर-मॅनला हिंदी आणि पंजाबी भाषांमध्ये आवाज देणं हा माझ्यासाठी खूप छान अनुभव आहे. यासाठी मी फार उत्सुक असून मला छान वाटतंय. या सिनेमाच्या रिलीजची मी आतुरतेने वाट पाहत, असल्याचं शुभमन गिलने ( Shubman Gill ) म्हटलं आहे.

Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अभिनेता प्रभासच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

कधी होणार सिनेमा रिलीज?

येत्या १ जून रोजी ‘स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-वर्स’ सिनेमा विविध भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मराठी, अंग्रेजी, हिंदी, तमिल, तेलुगु, कन्नड़, मल्याळम, गुजराती, पंजाबी आणि बंगाली या भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. चाहते या सिनेमाची उत्सुकतेने वाट पाहतायत.

शुभमन गिल सध्या आयपीएल 2023 स्पर्धेत व्यस्त आहे. पण, या व्यस्ततेतही तो स्पायडरमॅनची भूमिका बजावत आहे. गिल लवकरच इंडियन स्पायडर मॅनच्या भूमिकेत दिसणार आहे. यासाठीची सर्व तयारी करण्यात आली आहे. तसेच शुभमन गिलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रश्मिका मंधानावर क्रश असल्याचं सांगितलं होतं.

Exit mobile version