Star Plus will once again show the family ties; ‘Kyonki Saas Bhi Kabhi Bahu Thi’ promo released : मनोरंजनाच्या क्षेत्रात ‘‘क्युँकी सास भी कभी बहू थी’’ ही मालिका भारतीय दूरचित्रवाणी वाहिन्यांवर आजवर प्रसारित झालेल्या सर्वात लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. 2000 मध्ये सुरू झालेल्या या मालिकेला केवळ ‘प्राइम टाइम’मध्येच स्थान मिळाले, असे नाही; तर लाखो भारतीय कुटुंबांच्या हृदयात या मालिकेने कायमचे स्थान पटकावले. ती केवळ एक दैनंदिन मालिका राहिली नाही तर ही मालिका म्हणजे पिढ्या-पिढ्यांमध्ये प्रतिध्वनित झालेली भावना बनली. एक अशी मालिका होती. जी रोज रात्री घरातल्या सर्वांना एकत्र आणू लागली. ज्याद्वारे तुलसी आणि विराणी परिवार घरांघरात परिचयाचा झाला.
पुनीत बालन यांचं महत्त्वाचं पाऊल; डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी डिजे लावणाऱ्या मंडळांना मदत नाही
ज्या काळात भारतीय दूरचित्रवाणी वाहिन्या आपली ओळख निर्माण करत होते. त्या काळात ‘क्युँकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेने प्रेक्षकांमध्ये खोलवर प्रभाव निर्माण केला. एकत्र कुटुंबात घडणारे रोजचे नाट्य, आनंद आणि संघर्ष या मालिकेत टिपले जात असे. 25 वर्षांनंतर, आजही लाखो प्रेक्षकांच्या हृदयात ‘क्युँकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेने बनवलेले एक खास स्थान कायम आहे. देशभरातील प्रेक्षकांच्या या जुन्या आठवणींना जागे करण्यासाठी पुन्हा एकदा ही मालिका सज्ज झाली आहे आणि या मालिकेच्या नव्या सीझनचा पहिला प्रोमो प्रदर्शित झाला आहे. भावनांची एक नवी सरमिसळ यात पेश करण्यात आली आहे, जी या मालिकेचा समृद्ध वारसा जिवंत ठेवते.
स्वत: हिंदीचा अहवाल स्विकारून मोर्चातून मनसेवर कुरघोडी; सामंतांचा उद्धव ठाकरेंना टोला
‘क्युँकी सास भी कभी बहू थी’ सोबत जणू समाजाची मूल्ये, श्रद्धा, वैशिष्ट्ये व्यापकदृष्ट्या दर्शवणाऱ्या सांस्कृतिक कलाकृतीचे पुनरागमन होत आहे. एक अशी मालिका जी पुन्हा ‘प्राइम टाइम’ची व्याख्या नव्याने परिभाषित करण्यासाठी सज्ज आहे. स्मृती इराणीने साकारलेली तुलसी ही व्यक्तिरेखाही ‘स्टार प्लस’ वाहिनीच्या या सर्वात वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या या मालिकेसह पुनरुज्जीवित होत आहे. देशभरात सर्वाधिक काळ ‘प्राइम टाइम’ मिळवणाऱ्या गाथेचे हे विजयी पुनरागमन आहे. भारतीय दूरचित्रवाणीच्या ब्रँडची बांधणी करणारी ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘क्युँकी सास भी कभी बहू थी’ ही मालिका भविष्याकडे परतत पुनरागमन करण्यास सज्ज आहे.
सावधान! आज राज्यात जोर’धार’, ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा ऑरेंज अन् यलो अलर्ट
वास्तव वाटणाऱ्या कथा आणि कुटुंबाचा भाग बनलेल्या पात्रांसह ज्यांनी भारतीय दूरचित्रवाणी वाहिनीवर क्रांती घडवली. त्या एकता कपूर या पुनरुज्जीवनाचे नेतृत्व करीत आहेत. निष्ठावान प्रेक्षावर्ग लाभलेली ही मालिका पुन्हा सुरू करण्याचा त्यांचा निर्णय भारतीय दैनंदिन मालिकांच्या उत्क्रांतीतील एक उल्लेखनीय क्षण आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णय घेतलाच! ‘या’ 14 देशांवर नवीन टॅरिफचा भार; दिवसही ठरला..
नवीन कलाकारांबद्दलची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. परंतु आश्वासन स्पष्ट आहे. या कार्यक्रमाला सांस्कृतिक आधारस्तंभ बनवणाऱ्या मुळांना आदरांजली वाहत, नवी पिढी हा वारसा पुढे नेईल. जुन्याजाणत्या चाहत्यांना सोनेरी आठवणींना उजाळा देण्याची चालून आलेली ही संधी आहे. तर नव्या प्रेक्षकांकरता एकेकाळी रेकॉर्डब्रेक टीआरपी मिळवणारी आणि हजारो भाग सुरू राहिलेली एक प्रतिष्ठित मालिका अनुभवण्याची ही एक दुर्मिळ संधी आहे.
मोर्चाआधीच धरपकड! पहाटे साडेतीन वाजता मनसेच्या ‘या’ बड्या नेत्याला घेतलं ताब्यात
‘क्युँकी सास भी कभी बहू थी’ ही केवळ मालिकाच नव्याने परतत नाही. तर ही मालिका एका युगाचे पुनरुज्जीवन करत आहे. मालिकेतील कालातीत कौटुंबिक नाट्य, अविस्मरणीय पात्रे आणि संबंधित कथाकथनाने, ही मालिका भारतीय घरांना पुन्हा एकदा एकत्र आणण्याकरता सज्ज झाली आहे.
‘क्युँकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेचा प्रोमो केवळ ‘स्टार प्लस’ वाहिनीवर प्रदर्शित झाला आहे! तुलसी आणि विराणी कुटुंबाचे तुमच्या घरात स्वागत करण्यासाठी सज्ज व्हा, कारण काही कथा कधीच पुसट होत नाहीत, तर त्या आपल्या हृदयाच्या अधिकाधिक निकटतम येतात.