स्वत: हिंदीचा अहवाल स्विकारून मोर्चातून मनसेवर कुरघोडी; सामंतांचा उद्धव ठाकरेंना टोला

स्वत: हिंदीचा अहवाल स्विकारून मोर्चातून मनसेवर कुरघोडी; सामंतांचा उद्धव ठाकरेंना टोला

Uday Samant on MNS and Udhhav Thackeray march against Hindi Compulsion : राज्यामध्ये राज्य सरकारने मागे घेतलेल्या पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयानंतर अद्याप देखईल हिंदी विरूद्ध मराठी यावर वाद कायम आहे. तसेच यामध्ये राजकारण देखील केलं जात आहे. त्यावर आता मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. उद्धव ठाकरेंनी हिंदीचा अहवाल स्विकारून मोर्चातून मनसेवर कुरघोडी केल्याचं सामंत म्हणाले.

उदय सामंत नेमकं काय म्हणाले?

सध्या राज्यात विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यादरम्यान विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधत असताना सामंत यांना मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या मोर्चाबाबत विचारणा करण्यात आली होती. त्यावर सामंत म्हणाले की, मनसेचा मोर्चा हा वैयक्तिक आणि मराठीसाठी होता. पण उद्धव ठाकरे त्यात विनाकारण सहभागी झाले.

मोर्चाआधीच धरपकड! पहाटे साडेतीन वाजता मनसेच्या ‘या’ बड्या नेत्याला घेतलं ताब्यात

उद्धव ठाकरे हे ते व्यक्ती आहेत. ज्यांनी मुख्यमंत्री असताना हिंदी भाषा सक्तीचा अहवाल स्विकारला होता. मात्र आता जेव्हा ते विरोधी पक्षात आहेत. तेव्हा ते केवळ राजकारण करण्यासाठी हिंदी सक्तिचा विरोध आणि आपण मराठीचे तारणहार आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशी टीका उदय सामंत यांनी केली.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा मोठा निर्णय; तालीम हॉलच्या भाड्यात ५०% सवलत

त्याचबरोबर यावेळी त्यांनी मीरा रोडमध्ये आज काढल्या गेलेल्या पण पोलिसांची परवानगी नसलेल्या मोर्चाबद्दल म्हणाले की, मीरा रोडमध्ये कुठला मोर्चा काय आहे? हे मला माहित नाही. तसेच तेथे झालेल्या अमराठी माणसाच्या मारहाणीवर कायदेशीर असेल त्याला पोलीस तपासून घेतील. तर कुर्ला वृक्षतोडी संदर्भात कोणीही आरोप केले हे नाही. तर वस्तुस्थिती तपासली पाहिजे. तसेच जाणीवपूर्वक कोणी असेल तर तपासणी करू.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube