सावधान! आज राज्यात जोर’धार’, ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा ऑरेंज अन् यलो अलर्ट

सावधान! आज राज्यात जोर’धार’, ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा ऑरेंज अन् यलो अलर्ट

Maharashtra Rain Update : राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने (Maharashtra Rain Update) धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. आजही राज्यात ढगाळ हवामान (Heavy Rain) आहे.  काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. जुलै महिन्यात राज्यात समाधानकारक पाऊस (IMD Rain Alert) पडला आहे. सरासरीच्या 99 टक्के पाऊस आतापर्यंत झाला आहे. पुढील तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, हवामान विभागाने नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, वाशिम आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, अकोला या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुढे हवामान कसे राहणार?

कोकण, मध्य महाराष्ट्र,मराठवाडा आणि विदर्भात 8 जुलै रोजी काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज हवामान विभागाने (Weather Forecast) व्यक्त केलाय. कोकण, मध्य महाराष्ट्र,मराठवाडा आणि विदर्भामध्ये 9 जुलै आणि 10 जुलै रोजी तुरळक ठिकाणी खूप जोरदार पावसाची शक्यता आहे.

छत्री घेवूनच बाहेर पडा! आज मुसळधार कोसळणार, ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

महाराष्ट्रात गेल्या काही आठवड्यांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, IMD ने पाच ते आठ जुलैपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे . कोकण, घाटमाथा आणि विदर्भ भागात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असल्याने नागरिकांची खबरदारी अत्यंत गरजेची ठरली आहे. विशेषतः कोकण, घाटमाथा आणि विदर्भाच्या महाराष्ट्रातील रंगीत ऑरेंज अलर्ट जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि संभाव्य धोक्याचा इशारा आहे.

नागरिकांनी घरे सुरक्षित ठेवून, बाहेर जाण्यासाठी सूचनांचे काटेकोर पालन करावे. राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. पुढील चार दिवसही जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केलाय.

गडचिरोलीत पुराचा धोका वाढला

गडचिरोली जिल्ह्यात कालपासून संततधार पाऊस सुरू आहे. गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडण्यात आले आहेत. या धरणातून साडेतीन लाखांपेक्षा जास्त क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाणी आज संध्याकाळपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठा पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या जिल्ह्याला सोमवारी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला होता तर आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुसळधार पावसात रामशेज किल्ल्यावर स्वच्छता अन् वृक्षारोपण, जयंत पाटील, खासदार लंकेंसह भगरेंचा सहभाग

follow us
  • fb
  • instagram
  • youtube