Tamannaa Bhatia Milan Fashion Week Debut: तमन्ना भाटिया (Tamannaa Bhatia) तिच्या निर्दोष फॅशन स्टेटमेंटसाठी ओळखली जाते तिच्या फॅशनच्या अनोख्या अदा सगळ्यांनी आजवर अनुभवल्या. या बॉलीवूड (Bollywood) दिवाने अलीकडेच लॅक्मे फॅशन वीकमध्ये वाणी वत्सनेच्या हटके कलेक्शन पिरोई, व्हीवाणी बाय वाणी वत्स (Milan Fashion Week) या फॅशन लेबलसाठी डिझाइन केलेल्या ड्रेसमध्ये तिने आपल्या फॅशनचा जलवा रॅम्पवर चालताना दाखवला. दरम्यान अत्यंत अपेक्षित असलेल्या रॉबर्टो कॅव्हली स्प्रिंग/समर 2025 शोमध्ये आपल्या फॅशनची अनोखी झलक दाखवली आहे.
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Cannes Film Festival) तिच्या शानदार पदार्पणानंतर तमन्ना भाटिया आता 18 सप्टेंबर 2024 रोजी रॉबर्टो कॅव्हली SS25 शोमध्ये सहभागी झाली. या कार्यक्रमात पहिल्यांदाच हजेरी लावणारी तमन्ना जागतिक फॅशन मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. एका निवेदनात अभिनेत्रीने तिचा उत्साह व्यक्त करताना म्हटले आहे की, ‘माझ्या सिंधी वारशामुळे कवल्लीचे घर घरासारखे वाटते. प्राण्यांच्या प्रिंट्स, सोनेरी आणि बोल्ड ग्लॅमरचे सिंधी प्रेम ब्रँडच्या बोल्ड ड्रेसमध्ये मला हा फॅशन विक करताना मज्जा येते.’
हा कार्यक्रम देखील एक व्यासपीठ आहे, जिथे फॅशन आणि वारसा एकत्र येतो. रॉबर्टो कॅव्हॅली शोमध्ये तमन्नाच्या उपस्थितीमुळे तिच्या स्वतःच्या सिंधी संस्कृतीचा वारसा जपणार आहे. कामाच्या आघाडीवर तमन्ना चमकत आहे. ती सध्या स्त्री 2 गाण्याच्या आज की रातच्या यशाचा आनंद घेत आहे आणि तिने तमिळ ब्लॉकबस्टर अरनमानाई 4 सह 2024 चा हिट गाणे आधीच दिले आहे. तिच्या आगामी तेलगू चित्रपट ‘ओडेला 2’ आणि ओटीटी प्रोजेक्ट डेअरिंग पार्टनर आहे.
Tamannaah Bhatia: ‘न्यू इट गर्ल ते हिट गर्ल’ तमन्ना भाटियाचा अनोखा प्रवास
तिच्या रॅम्प वॉक ने सगळ्यांना मोहित करून मंत्रमुग्ध केले. व्यावसायिक आघाडीवर तमन्ना तिच्या चाहत्यांना तिच्या आगामी तमिळ चित्रपट “अरनमानाई 4” द्वारे मोहित करण्यासाठी तयार आहे, जो पोंगल 2024 मध्ये रिलीज होणार आहे. ती “बांद्रा” नावाच्या मल्याळम प्रकल्पात देखील काम करत आहे आणि दिग्दर्शक म्हणून जॉन अब्राहम सोबत दिसली आहे. निखिल अडवाणीचा ‘वेद’मध्ये ती बघायला मिळाली.