Tejswini Pandit : मराठीतील आघाडीची अभिनेत्री तेजस्विनी पंडित ( Tejswini Pandit ) तिच्या अभिनयासह वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे देखील तेवढीच चर्चेत असते. यावेळी देखील तिने असेच एक ट्विट केलं आहे. ज्यामधून तिने महाराष्ट्रात आणि विशेषतः पुण्यात सुरू असलेल्या वाढती गुन्हेगारी आणि ड्रग्जविरोधात आवाज उठवला आहे. तेजस्विनी म्हणाली की, ‘असा आपला महाराष्ट्र कधीच नव्हता’.
तुझ्यात किती दम आहे तो बघायचाय; मनोज जरांगेंचा पुन्हा फडणवीसांवर ‘वार’
या ट्वीटमध्ये तेजस्विनी लिहिलेले आहे की, दुष्काळ, बेरोजगारी, महागाई हे प्रश्न वर्षानुवर्ष सतावत आहेतच…आता सर्रास गोळीबार , खून, ड्रग्ज….? असा आपला महाराष्ट्र कधीच नव्हता असं म्हणत तिने राज्यातील वाढती गुन्हेगारी आहे ड्रग्स विरोधात आवाज उठवला आहे. या अगोदर देखईल तिने राज्यातील राजकीय आणि सामाजिक विषयांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दुष्काळ, बेरोजगारी, महागाई हे प्रश्न वर्षानुवर्ष सतावत आहेतच…
आता सर्रास गोळीबार , खून, ड्रग्ज….?असा आपला महाराष्ट्र कधीच नव्हता 💔
— TEJASWWINI (@tejaswwini) February 25, 2024
अखेर अखिलेश यादव भारत जोडो यात्रेत; जागावाटपाचा तिढा सुटला…
‘टोल’वरुन तेजस्विनी आक्रमक
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS)टोलमाफीचा मुद्दा पुन्हा उचलून धरला होता. त्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी चांगलेच कात्रीत पकडले होते. त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी माध्यमांसमोर मांडलेली भूमिका आणि प्रत्यक्षात असलेली भूमिका यामध्ये वेगळेपण दिसून आले होते. यावरुन मनसे आक्रमक झाली होती. याच मुद्द्यावरुन मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit)हिने स्पष्ट भूमिका घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा तिने महाराष्ट्रात आणि विशेषतः पुण्यात सुरू असलेल्या वाढती गुन्हेगारी आणि ड्रग्जविरोधात आवाज उठवला आहे.