Download App

The Buckingham Murders: करीनाच्या ‘द बकिंघम मर्डर्स’चा टीझर प्रदर्शित, या अंदाजात दिसतेय बेबो

Kareena Kapoor: करीना कपूर'चा बहुप्रतिक्षित चित्रपट 'द बकिंघम मर्डर्स' (The Buckingham Murders)चे टीझर रिलीज झाले आहे.

The Buckingham Murders Teaser Out: करीना कपूर खानचा (Kareena Kapoor) आगामी चित्रपट ‘द बकिंगहॅम मर्डर्स’चा टीझर (The Buckingham Murders Teaser ) मंगळवारी 20 ऑगस्ट रोजी रिलीज झाला आहे. ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ या (The Buckingham Murders) थ्रिलर चित्रपटात करिनाने पुन्हा एकदा तिच्या लेडी बॉस लूकने चाहत्यांना प्रभावित केले आहे.

करीना कपूर खानने तिच्या सोशल मीडिया हँडलवरून (social media) तिच्या आगामी चित्रपटाच्या टीझरची झलक दाखवली आहे. (The Buckingham Murders Teaser ) रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर अभिनेत्रीने पोस्टर शेअर करून टीझर रिलीज करण्याची घोषणा केली होती. टीझर सस्पेन्स आणि थरारक आहे. हा चित्रपटही याच पद्धतीने प्रेक्षकांची मने जिंकेल अशी अपेक्षा आहे.

एकता कपूर आणि करीना पुन्हा एकत्र

करीना कपूर खान आणि एकता कपूर ‘द बकिंगहॅम मर्डर्स’मधून पुन्हा एकत्र येत आहेत. एकता या चित्रपटाची निर्माती आहे. या वर्षाच्या सुरुवातीला करिनाने एकता कपूरच्या ‘क्रू’ चित्रपटातही काम केले होते. ‘द बकिंघम मर्डर्स’ बद्दल बोलायचे झाले तर करीना या चित्रपटात पोलीस अधिकारी जसमीत भामराच्या भूमिकेत दिसणार आहे. बकिंगहॅमशायरमधील एका खून झालेल्या मुलाच्या मृत्यूचे प्रकरण ती सोडवताना दिसणार आहे.

Kareena Kapoor: ‘सिंघम अगेन’ मधील अभिनयाबद्दल करिना कपूर खाननं केला खुलासा

हंसल मेहता यांचे दिग्दर्शन

करिनाचा बॉस लेडी लूक चाहत्यांना थिएटरमध्ये आणू शकतो. अभिनेत्रीने तिच्या उत्कट आणि थरारक अभिनयाने प्रभावित केले आहे. ‘द बकिंगहॅम मर्डर्स’च्या माध्यमातून करीना स्वतःची एक वेगळी प्रतिमा प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांनी केले आहे.

‘या’ दिवशी रिलीज होणार

‘द बकिंगहॅम मर्डर्स’ सुरुवातीला 2023 मध्ये रिलीज होणार होता. मात्र आता हा चित्रपट थेट 13 सप्टेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. महान फिल्म्स आणि टीबीएम फिल्म्स अंतर्गत निर्मित आणि बालाजी टेलिफिल्म्स प्रस्तुत, ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ असीम अरोरा, कश्यप कपूर आणि राघव राज कक्कर यांनी लिहिले आहे.

follow us