‘The Buckingham Murders’ चे पहिले पोस्टर प्रदर्शित; चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत करीनाची मोठी अपडेट

‘The Buckingham Murders’ चे पहिले पोस्टर प्रदर्शित; चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत करीनाची मोठी अपडेट

The Buckingham Murders Poster: हंसल मेहता दिग्दर्शित करीना कपूर स्टारर चित्रपट ‘द बकिंघम मर्डर्सची’ (The Buckingham Murders) घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्कठंता निर्माण झाल्याचे बघायला मिळत आहे. हा चित्रपट एका थरारक कथेने प्रेक्षकांना नक्कीच आश्चर्यचकित करणार आहे. (Social media) करीना कपूरचा ‘द बकिंघम मर्डर्सची’ 27 ऑक्टोबर 2023 दिवशी प्रदर्शित होणार आहे. मात्र सध्या हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच आपली अनोखी जादू दाखवण्यास सुरुवात केली आहे. या सिनेमाला बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये स्टँडिंग ओव्हेशन मिळाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)


हंसल मेहता दिग्दर्शित करीना कपूरच्या द बकिंगहॅम मर्डर्सला BFI लंडन फिल्म फेस्टिव्हल 2023 (BFI London Film Festival) साठी अधिकृत निवड करण्याची घोषणा करण्यात आली आहे. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला, त्यावेळेस या सिनेमाने एक अनोखी छाप सोडली आणि प्रेक्षकांनी या चित्रपटाला उत्स्फूर्त दाद दिली. यावेळी चित्रपट महोत्सवात दिग्दर्शक हंसल मेहताही उपस्थित होते. या चित्रपटाला त्याच्या रोमांचक कथा आणि दिग्गज कलाकारांसह प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळत असल्याचे बघायला मिळत आहे. यामुळे मोठ्या पडद्यावर चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा आणखीच वाढत असल्याचे बघायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jio MAMI Mumbai Film Festival (@mumbaifilmfestival)


हंसल मेहता दिग्दर्शित करीना कपूर स्टारर ‘द बकिंघम मर्डर्स’ या सिनेमाचे पहिले पोस्टर लाँच करण्यात आले आहे. यामध्ये त्याची मुख्य अभिनेत्री करीना कपूर खान एका अनोख्या अंदाजात दिसत आहे. ‘द बकिंगहॅम मर्डर्स’च्या पहिल्या अधिकृत पोस्टरने चाहत्यांची चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढवली आहे.

या पोस्टरवर करीना कपूरला दोन पोलिसांनी पकडून ठेवल्याचे बघायला मिळत आहे. अभिनेत्रीला गुप्तहेर आणि आईची भूमिका साकारताना पाहणे नक्कीच एक अनोखा अनुभव असणार आहे. करीना खरोखरच या लूकमध्ये हटके अंदाजात बघायला मिळत आहे. हा चित्रपट पाहण्यास आकर्षक वाटणारी आंतरराष्ट्रीय स्तराची कथा घेऊन येणार असल्याचे दिसत आहे.

Dayaben: नवरात्रीत दयाबेनच्या लूकनं वेधलं लक्ष; पहिल्यांदाच पती अन् मुलासोबतचा व्हिडिओ व्हायरल

या सिनेमात करीना कपूरसोबत अॅश टंडन, रणवीर ब्रार आणि कीथ अॅलनसारखे दिग्गज कलाकार बघायला मिळणार आहेत. असीम अरोरा, कश्यप कपूर आणि राघव राज कक्कर यांनी लिहिलेल्या हंसल मेहता दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती शोभा कपूर, एकता आर कपूर आणि करीना कपूर खान यांच्यासह बालाजी टेलिफिल्म्स आणि टीबीएम फिल्म्स यांनी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube