Download App

पद्मविभूषण इलैयाराजा यांच्या संगीताने सजलेला ‘गोंधळ’ चे पोस्टर जबरदस्त प्रदर्शित

Gondhal हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय.

  • Written By: Last Updated:

The film eith music of Padma Vibhushan Ilaiyaraaja poster ‘Gondhal’, released : महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती यांना मोठ्या पडद्यावर नव्या उंचीवर नेणारा ‘गोंधळ’ हा चित्रपट येत्या नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून त्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

दिग्गजांच्या उपस्थित वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलचा कर्टन रेझर सोहळा संपन्न

मात्र या पोस्टरइतकीच चर्चेचा विषय ठरली आहे, या चित्रपटाची भव्य टेक्निकल टीम. खरंतर, एका परंपरेची गोष्ट जेव्हा मोठ्या पडद्यावर आणायची ठरते, तेव्हा त्या मागे असते एक ताकदीची स्वप्नवत टीम. ‘गोंधळ’लाही अशीच साथ लाभली आहे.

पूर्वी काही केलं तर साहेब पांघरून घालण्यासाठी असायचे, आता आपणच…; पुण्यात अजितदादांची जोरदार फटकेबाजी

‘अज्ञात’ या लघुपटासाठी नॅशनल अवॉर्ड प्राप्त झालेले दिग्दर्शक संतोष डावखर, ‘सिंधू भैरवी’, ‘रुद्रवीणा’, ‘सागरा संगमम’, ‘पझसी राजा’ ‘विश्व थुलासी’ अशा दाक्षिणात्य चित्रपटांसाठी नॅशनल अवॉर्ड मिळवणारे आणि आपल्या सुरांनी भारतीय चित्रपटसृष्टीला नवा आयाम देणारे दिग्गज संगीतकार, पद्मविभूषण इल्लैयाराजा, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘न्यूड’, ‘स्त्री’, ‘छिछोरे’, ‘कच्चा लिंबू’, ‘फुकरे ३’ अशा सुपरहिट चित्रपटांचे छायाचित्रण करणारे राज्य पुरस्कार विजेते अमलेंदू चौधरी आणि ‘घरत गणपती’, ‘संगीत मानापमान’, ‘रानटी’, ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ अशा अनेक चित्रपटांच्या कथा अधिक प्रभावी करण्यासाठी कलेचा नेमका धागा पकडणारे अनुभवी संकलक आशिष म्हात्रे. ‘सॅम बहादूर’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारे.

मोठी बातमी ! एमपीएससीची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली !

‘छावा’सह अनेक चित्रपटातील कलाकारांच्या व्यक्तिरेखेला आकार देणारे मेकअप डिझायनर श्रीकांत देसाई, तसेच ‘सॅम बहादूर’ आणि ‘सायकल’साठी नॅशनल अवॉर्ड प्राप्तविजेते, कॉश्यूम डिझायनर सचिन लोवाळेकर, ‘दंगल’ चित्रपटाचे आर्ट डिरेक्शन केलेले संदीप मेहेर, ‘लाईफ ॲाफ पाय’ आणि ‘स्लमडॅाग मिलिनियर’ साठी काम केलेले साऊंड डिझायनर जयेश ढाकण, ‘लापता लेडीज’चे कास्टिंग डिरेक्टर रोमिल, ‘मैं हू ना’, ‘क्रिश ३’, ‘चक दे इंडिया’, ‘चेन्नई एक्सप्रेस’चे डिआय कलरिस्ट मकरंद सुरते( रेडचिलीज कलर) अशी दमदार टीम या चित्रपटाला लाभली आहे.

Sonam Wangchuk : वांगचुक यांची NGO नेमकं काय करते?, रद्द झालेलं लायसन्स पुन्हा कसं मिळणार?

मराठी सिनेसृष्टीत असे मान्यवर एकत्र येणे, म्हणजे ‘गोंधळ’ चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आंतरराष्ट्रीय दर्जाची भव्य अनुभूती देणारा ठरणार आहे. पोस्टरमध्येही याच भव्यतेची झलक दिसत आहे. महाराष्ट्राच्या परंपरेवर आधारित ‘गोंधळ’ चित्रपटाची कथा, कलाकार आणि संगीत यांचा समन्वय या दमदार टीममुळे अधिक प्रभावीपणे मांडला जाणार आहे. पोस्टर पाहून चित्रपटाची उत्सुकता वाढली असून आता प्रेक्षक या चित्रपटाच्या टीझरची आतुरतेने वाट पाहात आहेत.

खोट्या मतदारांना चोपणारच, भाजप काय आमचा बाप नाही; मनसेचं भाजपला चॅलेंज

दिग्दर्शक संतोष डावखर म्हणाले, ‘गोंधळ’ या चित्रपटाची संकल्पना पारंपरिक असूनही त्याला साकारताना आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जा गाठण्याचा प्रयत्न केला आहे. अशा दमदार टेक्निकल टीमसोबत काम करण्याचा अनुभव विलक्षण होता. मला खात्री आहे की, प्रेक्षकांना हा चित्रपट भव्यतेचा नवा अनुभव देईल तसेच महाराष्ट्रसह विविध राज्यांत ही महाराष्ट्राची परंपरा ठसा उमटवेल. यात अशा काही गोष्टी आहेत, ज्या ७०एमएमवर भारतात पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहेत.’’

ब्रेकिंग : लडाख हिंसाचार प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक

डावखर फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संतोष डावखर यांनी लिहिले असून सहनिर्मात्या दीक्षा डावखर आहेत. या चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

follow us