ब्रेकिंग : लडाख हिंसाचार प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक
Activist Sonam Wangchuk arrested लडाख हिंसाचार प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक करण्यात आली आहे.

Activist Sonam Wangchuk arrested days after violent statehood protests in Ladakh : लडाख हिंसाचार प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक करण्यात आली आहे. काल (दि.25) हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह्ज लडाख एनजीओची (NGO) एफसीआरए नोंदणी रद्द करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वांगचुक यांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत वांगचुक यांना अटक करण्यात आली आहे.
लडाखमधील पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांच्या आंदोलनामुळे लडाखमधील (Ladakh) तरुण रस्त्यावर आले होते. ते तरुण हिंसक झाले होते. त्यावेळी पोलिस आणि आंदोलक यांच्यामध्ये वाद होऊन हिंसा उसळली. त्यात चार तरुणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झालेत. त्यानंतर केंद्र सरकारने (Central GOV) या हिंसेप्रकरणी वांगचुक यांना जबाबदार धरत त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे.
लडाखला राज्याचा दर्जा मिळावा यासाठी वांगचुक यांच्या नेतृत्वाखालील निदर्शने झाली आहेत. वांगचुक यांनी तब्बल चौदा दिवस यासाठी उपोषण केले आहे. त्यानंतर आंदोलनाला हिंसक वळण लावले आहे. हे हिंसक निदर्शने झाल्यानंतर 24 तासांत ही रद्द करण्यात आली आहे. यापूर्वी केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) वांगचुक यांच्या संस्थांकडून परकीय नियमन कायद्याच्या (एफसीआरए) कथित उल्लंघनांची चौकशी सुरू केली होती. सोनम वांगचुक यांच्याकडून एफसीआरए उल्लंघनाची चौकशी काही काळापासून सुरू आहे. परंतु अद्याप याप्रकरणी एफआयआर दाखल झालेली नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
गृह मंत्रालयाने काय आरोप केला ?
लडाखमधील हिंसेनंतर सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण सोडले आहे. त्यानंतर गृह मंत्रालयाने लगेच बुधवारी एक निवेदन जारी केला. त्यात तरुणांना हिंसाचारासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप वांगचुक यांच्यावर केलाय. या प्रकरणी लडाखचे उपराज्यपाल कविंदर गुप्ता यांनी एक पत्रक जारी केले. दंगलखोरांनी तरुणांना हिंसाचारासाठी प्रवृत्त केले. जमावाने सीआरपीएफ वाहन पेटवले आणि वाहनातील सैनिकांना जिवंत जाळण्याचा त्यांचा हेतु होता. तेव्हा सुरक्षा दलांच्या जवानांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला, असे पत्रकात म्हटले आहे.
Climate activist Sonam Wangchuk arrested by Ladakh police team led by DGP S D Singh Jamwal: Officials. pic.twitter.com/muxsxhSa5U
— Press Trust of India (@PTI_News) September 26, 2025